फलटण शहरात वीजपुरवठा राहणार खंडित; महावितरणची महत्त्वाची सूचना

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण शहर आणि परिसरातील विविध भागांमध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणने सर्व नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २९ सप्टेंबर : फलटण शहर पंचक्रोशी अंतर्गत असलेल्या विविध भागांमध्ये उच्चदाब आणि लघुदाब वाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. महावितरणने याबाबत अधिकृत सूचना जारी केली आहे.

दुरुस्तीची महत्त्वपूर्ण कामे

महावितरणच्या वतीने २२ के.व्ही. उच्चदाब वाहिनी आणि लघुदाब वाहिनीची दुरुस्ती, रोहित्र दुरुस्ती, तसेच लाईनवरील वेली आणि झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. या तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे संबंधित परिसरातील वीजपुरवठा खंडित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘या’ भागात राहणार वीजपुरवठा बंद

फलटण फिडरवरील गौरीशंकर डीपी, महादेव मळा, दहिवडी रोड आणि कोळकी या भागात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहील. तसेच मुन्सिपल फिडरवरील गोळीबार मैदान, विद्यानगर, लक्ष्मीनगर, तहसील ऑफिस, डी.एड. चौक, शिवाजीनगर आणि एसटी स्टँड परिसरात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहील.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!