दैनिक स्थैर्य । दि.१५ जानेवारी २०२२ । फलटण । नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत साखरवाडी विद्यालयातील ९ विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन करून जिल्ह्यात यशाचा झेंडा फडकावला. इयत्ता पाचवी परीक्षेत सतरा बसून आठ उत्तीर्ण झाले व तीन पात्र ठरले. प्रथम दोशी, वैष्णवी साबळे, आर्या बोंद्रे हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले.
या विद्यार्थ्यांना सौ. गाडेकर, सौ. रेवडीकर, सौ. तावरे व श्री. ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेस १२ प्रविष्ट ६ शिष्यवृत्तीस पात्र ठरले. तनुश्री साळुंखे, रेणुका भोसले, जान्हवी सरगर, हर्षदा लांडगे, प्रणीता शिंदे, आदित्य भोसले पात्र ठरले. या विद्यार्थ्यांना म. बा. लांंडगे, सौ. पिंगळे, सौ. भोसले, सौ. थोरात, सौ. जगताप, फडतरे यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्र. गो. साळुंखे – पाटील, संस्था अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील, राजेंद्र शेवाळे, राजेंद्र भोसले, कौशल भोसले व सचिव सौ. उर्मिला जगदाळे यांनी केले.