खावली येथील कोरोना केअर सेंटरमधील 8 जणांना आज डिस्चार्ज

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

जिल्ह्यात आज पर्यंत 219 बरे होऊन गेले घरी

स्थैर्य, सातारा दि. 2 : कोरोना केअर सेंटर, खावली  येथे दाखल असणारे 8 जण आज कोरानातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.

यामध्ये खटाव तालुक्यातील गादेवाडी येथील 1 पुरुष व 2 महिला, मांजरवाडी येथील 1 महिला, सातारा तालुक्यातील कुस खुर्द येथील 1 पुरुष व 2 महिला, कोरेगाव तालुक्यातील फलेवाडी येथील 1 महिला असे 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्ह्यात आजपर्यंत विविध ठिकाणावरून आता पर्यंत 219 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!