
जिल्ह्यात आज पर्यंत 219 बरे होऊन गेले घरी
स्थैर्य, सातारा दि. 2 : कोरोना केअर सेंटर, खावली येथे दाखल असणारे 8 जण आज कोरानातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.
यामध्ये खटाव तालुक्यातील गादेवाडी येथील 1 पुरुष व 2 महिला, मांजरवाडी येथील 1 महिला, सातारा तालुक्यातील कुस खुर्द येथील 1 पुरुष व 2 महिला, कोरेगाव तालुक्यातील फलेवाडी येथील 1 महिला असे 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्ह्यात आजपर्यंत विविध ठिकाणावरून आता पर्यंत 219 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.