
स्थैर्य, सातारा, दि. २६: उधारीच्या पैशावरून एमआयडीसी येथील चायनीज गाडाचालकाने साथीदारांच्या साह्याने एकाला दांडक्याने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी नितीन सावंत, उत्तम सावंत रा. नवीन एमआयडीसी यांच्यासह सहा अनोळखी इसमांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, विकास अशोक भवर हे मित्र अजिंक्य शिंदे यांच्यासह चायनीज खाण्यासाठी गेला होता. यावेळी उधारीच्या पैशावरून त्यांच्यात वाद झाला. चायनीज गाड्याचा मालक नितीन सावंत याने विकास भवर यांना दांडक्याने उजव्या डोळ्यावर, डोक्यावर पाठीत, पायावर मारहाण केली. तसेच नितीन सावंत याचे वडिल उत्तम सावंत यानेही भवरला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी विकास भवर यांचा मित्र अजिंक्य शिंदे हे भांडणे सोडवण्यासाठी आले मात्र, त्यांना संशयितांसोबत असणार्या सहा अनोळखी इसमांनी रोखून ठेवले इतर दोनजणांनी त्यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. याप्रकरणी नितीन सावंत, उत्तम सावंत व अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास भोसले करत आहेत.