दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021 । मुंबई । शेतकऱ्यासाठी वार्षिक उत्पादन हा जीवन आणि उपजीविकेसाठीचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. एकूण पिकांचे उत्पादन हे जमिनीच्या लाभकारकतेचे ठोस संकेत देतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यासाठी नवे तंत्र आणि शेतीतील पद्धतींचा वापर करून पिकांचे उत्पादन वाढवण्याचे सर्वोत्तम मार्ग शिकणे आवश्यक आहे. पिकांचे उत्पादन वाढवण्याचे ७ मार्ग पाहुयात:
१. पेरणी करण्यापूर्वी बीज तयार करा: अपेक्षित अंकुर येण्यासाठी पेरणीपूर्वी बीज तयार करणे आवश्यक आहे. हे समजण्यासाठी भूईमुगाचे उदाहरण घेऊयात. रोपणासाठी बीज तयार करण्यापूर्वी थियामेथोक्सम ३० एफएस (शाइनस्टार प्लस) ची फवारणी करण्याची शिफारस केली जाते. जेणेकरून बियाणांना कवच मिळेल. (कव्हरबाबत खबरदारी बाळगत). यामुळे रोपटे मजबूत होणे आणि मातीतून अधिक चांगले पोषक घटक शोषण्यास मदत मिळते. रोपांची उगवण आणि प्रारंभिक विकासाच्या टप्प्यादरम्यान रोपट्यासमोर येणाऱ्या धोक्यांविरुद्ध एक प्रभावी लसीचे काम याद्वारे पार पाडले जाते. अशा उत्पादनांचा वापर करून, एक उच्च दर्जाचे पिक कटाईसाठी येईल, याची हमी मिळते. यासाठी आधीच्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी खर्चाची गरज असते.
२. सूक्ष्म पोषक घटकांचा संतुलित आहार आवश्यक आहे: पिकांना पोषण प्रदान करण्यासाठी डीएपीचा वापर करताना आपण कमी प्रमाणात आवश्यक असलेल्या घटकांनाही लक्षात घेतले पाहिजे. चांगले पिक घेण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. या सूक्ष्म पोषक घटकांमध्ये प्रामुख्याने झिंक, बोरॉन इत्यादींचा समावेश असतो, जे मातीचा पोत वाढवतात. हे आवश्यक सूक्ष्म पोषक घटक प्रदान करण्यासह, इतरही लाभकारक विविध पोषण घटकांविषयी स्पष्टता असली पाहिजे. संशोधनानुसार, झिंक ३३%च्या तुलनेत झिंक १२% (अमृत झिंक) हे एक हाय-ग्रेड उत्पादन आहे. कारण याची डीएपीप्रमाणे इतर उत्पादनांसोबत प्रतिक्रिया होत नाही. तसेच अमृत झिंकची खूप कमी प्रमाणात आवश्यकता असते. जे अनिवार्य रुपाने झिंक ३३% च्या तुलनेत खूप वेगाने शोषले जाते. त्यामुळे योग्य उत्पादन आणि योग्य पोषणाचा वापर केला गेला पाहिजे, याबाबत खबरदारी बाळगावी.
रोपट्यांमध्ये पोषक घटकांची कमतरता असल्याचे अनेक लक्षणेही दिसतात. उदा. पाने पिवळी पडणे, करडे डाग/ सुरकुत्या येणे इत्यादी. या लक्षणांची माहिती घेणे आणि रोपट्यांतील उणीवा अधिक परिणामकारक बनण्यापूर्वीच योग्य वेळी आवश्यक प्रमाणात पोषक घटक प्रदान करणे महत्त्वाचे आहे.
३. मजबूत मूळे ही उत्तम पिकांचा आधार ठरतात: जिबरेलिक अॅसिड पिकांसाठी एक मजबूत प्रणाली विकसित करण्यास मदत करतात. रोपट्यांची दमदार मूळांची यंत्रणा महत्त्वाची आहे. कारण यामुळेच पिकांची मुळे पोषक घटकांना अधिक कुशलतेने शोषून घेऊ शकतात आणि यातून एकूण पिकांची ताकद वाढते. ही हाय-ग्रेड उत्पादने शेतीच्या पद्धतींत वापरणे योग्य आहे, कारण ते वेगाने अंकुरण आणि मजबूत पिकांमध्ये रुपांतरीत होतात व ही पिके आजारांविरोधात मजबुतीने उभी राहतात. फुलांची संख्या वाढवण्यासही यामुळे मदत मिळते व परिणामी उत्पादनाचे प्रमाण वाढते. पिकाच्या विकासातील प्रारंभिक टप्प्यांदरम्यान पिकांच्या उत्पादनात वाढ करणे शक्य आहे, याचा विचार सर्वप्रथम झाला पाहिजे. त्यानंतरच्या टप्प्यांत पिकांचे उत्पादन सुधारणे आणि अनेक पटींनी वाढवणे शक्य नाही. आपण प्रमाणित जिबरेलिक अॅसिडयुक्त उत्पादनांचा वापर करू शकतो. उदा. ग्रेट एक्स्पर्ट बाय सेफेक्स, जे पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी अद्भूत काम करू शकते.
४. कीटकव्यवस्थापन: महामारी आणि कीटकांचे हल्ले नियंत्रित करायची असेल तर, कीडीचा शोध लावण्यासाठी नेहमी कीड आढळणाऱ्या जागांचे निरीक्षण करण्याची शिफारस केली जाते. अशा टप्प्यांमध्ये सतर्कता खूप आवश्यक आहे. या विषयांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही प्रमुख भारतीय कृषी-रासायनिक उद्योग- सेफेक्सच्या वेबसाइटशी संपर्क करू शकता. प्रत्येक दर्जेदार उत्पादन केवळ शिफारस केलेल्या प्रमाणातच देणे आवश्यक आहे. समाधानकारक परिणाम प्राप्त करण्यासाठी अखेरच्या शब्दापर्यंत निर्देशांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. शतकांपासून चालत आलेली म्हण शेतीबाबतही लक्षात ठेवली पाहिजे. प्रतिबंध हाच खरा उपाय.
५. तज्ञांचा सल्ला घेणे: आपल्याला काही शंका असल्यास, शेती क्षेत्रातील प्रमाणित तज्ञांशी संपर्क करणे सर्वात चांगले, ते आपल्या शंका दूर करण्यात खूप मदत करू शकतात. हे तज्ञ शेतीसंबंधी अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण सल्ला देऊ शकतात. उदा. रोपट्याचा रहस्यमय आजार किंवा पिकांवरील अज्ञात कीड, जी आपल्या संपूर्ण शेताला धोक्यात आणू शकते. तुम्ही या उच्च शिक्षित आणि कुशल तज्ञांशी संपर्क करू शकतात, जे या क्षेत्राशी संबंधित सर्व समस्यांतील जाणकार आहेत. अशा वेळी मदत आणि बहूमोल मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी, तुम्ही सेफेक्स हेल्पलाइनशी संपर्क करू शकतात आणि शेती संबंधी प्रत्येक अडचणींतून मार्ग करू शकतात.
६. आळी-पाळीने पिक घेणे महत्त्वाचे: पिकांच्या चक्राला खूप महत्त्व आहे. यामुळे माती पुन्हा जिवंत होते. एकच पिक घेतल्याने मातीवर येणारा अतिरिक्त ताण दूर करून नव्या जीवास श्वास घेण्यात मदत होते. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, काही पिके मातीतील पोषक घटक शोषत करतात तर काही पिके ते घटक मातीला प्रदान करतात. त्यामुळे विविध पिकांच्या शेतीसाठी आवश्यक घटकांद्वारे भरपूर सुपीक माती तयार करण्यासाठी दोन्ही बाजू संतुलित करणे अनिवार्य आहे. मातीला योग्य प्रमाणात पोषण देण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. परिणामी उच्च पिक उत्पादनाची सुविधा प्रदान केली जाते.
७. कार्यक्षमता वाढवणारे एजंट: पाण्यात पसरण्याची क्षमता मर्यादित असते आणि औषधांची फवारणी पानांच्या काही भागावरच होते. सेफेक्सचे तज्ञ, शेतकऱ्यांना स्प्रेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वेलवेटसारख्या ओल्या आणि पसरणाऱ्या एजंटमधील सर्वोत्कृष्ट उत्पादानाचा वापर करण्याचा सल्ला देतात. अशा प्रकारच्या उत्पादनाचा वापर केल्याने पाण्याच्या पृष्ठभागावरील ताण कमी होऊ शकतो आणि अशा प्रकारे याचा प्रसार दर १० पटींनी प्रभावीपणे वाढू शकतो. त्यामुळे समान प्रमाणात औषध संपूर्ण पानावर पसरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पारगम्यतेची हमी मिळणे शक्य आहे. पानांच्या बाह्य पृष्ठभागावर सततच्या औषधांच्या थरामुळे विविध प्रकारच्या कीटकांपासून संरक्षण मिळते. यामुळे शेतकऱ्याला कमी प्रयत्न आणि कमी खर्चात प्रभावीपणे उत्पादन मिळवता येते.