दैनिक स्थैर्य । दि.०६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । महाराष्ट्रातील ९८ सहकारी व ९९ खाजगी अशा एकूण १९७ साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गळीत हंगामात दि. २ फेब्रुवारी पर्यंत ७ कोटी ४१ लाख ३४ हजार मे. टन ऊसाचे गाळप करुन ७ कोटी ४६ लाख ८८ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.०७ % पडला आहे.
सातारा जिल्ह्यात ६२ लाख ६१ हजार ४८३ मे. टन ऊस गाळप आणि ६५ लाख ६३ हजार ६४० क्विंटल साखर उत्पादन
सातारा जिल्ह्यातील ६ सहकारी व ७ खाजगी अशा एकूण १३ कारखान्यांनी या कालावधीत ६२ लाख ६१ हजार ४८३ मे. टन ऊसाचे गाळप करुन ६५ लाख ६३ हजार ६४० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.४८ % पडला आहे. त्यापैकी ६ सहकारी साखर कारखान्यांनी या कालावधीत २५ लाख ८७ हजार ८२० मे. टन ऊसाचे गाळप करुन २९ लाख २४ हजार ४९५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.३०% पडला आहे, तर ७ खाजगी साखर कारखान्यांनी ३६ लाख ७३ हजार ६६३ मे. टन ऊसाचे गाळप करुन ३६ लाख ३९ हजार १४५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ९.९१ % पडला आहे.
जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण मध्ये २,४४,८३० मे. टन ऊस गाळप आणि २,७४०५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.१९ %, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि., रेठरे बु|| ७,५४,७५० मे. टन ऊस गाळप आणि ७,७८,४३० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.३१ %, बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगर पाटण १,५०,८४० मे. टन ऊस गाळप आणि १,७२,७२५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.४५ %, सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि., यशवंतनगर कराड ७,०१,७०० मे. टन ऊस गाळप आणि ८,५४,७४० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १२.१८ %, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि., शाहुनगर शेंद्रे ४, ०६,५६० मे. टन ऊस गाळप आणि ४,५६,२७० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.२२ %, अथणी शुगर संचलित रयत सहकारी साखर कारखाना लि., शेवाळेवाडी, ता. कराड ३,२९,१४० मे. टन ऊस गाळप आणि ३,८८,३८० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.८० %, श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी, ता. फलटण २,४३,०४२ मे. टन ऊस गाळप आणि २,१०,३५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ८.६५ %, गुरु कॉमोडीटी सर्व्हिसेस प्रा. लि., चिमणगाव, ता. कोरेगाव १०, ४२,४३० मे. टन ऊस गाळप आणि ११,२२,८०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.७७ %, जयवंत शुगर्स लि., धावरवाडी, ता. कराड ४,४५,५५५ मे. टन ऊस गाळप आणि ४,४१,०५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ९.९० %, ग्रीन पॉवर शुगर लि., गोपूज, ता. खटाव ३,६९,३९० मे. टन ऊस गाळप आणि ३,५५,२०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ९.६२ %, स्वराज इंडिया ऍग्रो लि., उपळवे, ता. फलटण ४,८९,८२५ मे. टन ऊस गाळप आणि ४,१२,५५५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ८.४२ %, शरयू ऍग्रो इंडस्ट्रीज लि., कापशी, ता. फलटण ६,२१,५११ मे. टन ऊस गाळप आणि ५,९६,५०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ९.६० %, खटाव माण तालुका ऍग्रो प्रोसेसिंग लि., पडळ, ता. खटाव ४,६१,९१० मे. टन ऊस गाळप आणि ५,००,६९० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.८४ %.
कोल्हापूर जिल्ह्यातील १६ सहकारी व ७ खाजगी साखर कारखान्यांनी १ कोटी १७ लाख १५ हजार ३६१ मे. टन ऊस गाळप आणि १ कोटी ३७ लाख ६१ हजार १७० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.७६ %.
सांगली जिल्ह्यातील १० सहकारी, ३ खाजगी साखर कारखान्यांनी ५९ लाख ५ हजार ७१३ मे. टन ऊस गाळप आणि ६४ लाख ७१ हजार ६६९ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.९६ %.
पुणे जिल्ह्यातील १० सहकारी ६ खाजगी साखर कारखान्यांनी ८६ लाख ५७ हजार ५२५ मे. टन ऊस गाळप आणि ८७ लाख ४० हजार ७२५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.१० %.
सोलापूर जिल्ह्यातील १२ सहकारी २१ खाजगी साखर कारखान्यांनी १ कोटी ३९ लाख ४२ हजार ५७८ मे. टन ऊस गाळप आणि १ कोटी २५ लाख ५९ हजार ९४० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ९.०१ %.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ सहकारी ९ खाजगी साखर कारखान्यांनी ३६ लाख ४७ हजार ९८७ मे. टन ऊस गाळप आणि ३४ लाख ९ हजार ७१५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ९.३५ %.
अहमदनगर जिल्ह्यातील १४ सहकारी ९ खाजगी साखर कारखान्यांनी ९१ लाख २३ हजार ६८५ मे. टन ऊस गाळप आणि ८६ लाख ९८ हजार ३२० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ९.५३ %.