फलटण तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज; विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती, पाहा कोणत्या गावावर कोणाची जबाबदारी!


सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या आदेशानुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या फलटण तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सविस्तर यादी व माहिती जाणून घ्या.

स्थैर्य, फलटण, दि. १२ मार्च : सातारा जिल्ह्यातील फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका घेणे शक्य नसलेल्या फलटण तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासकराज लागू झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नुकतेच एका विशेष आदेशाद्वारे या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांचीच ‘प्रशासक’ म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, पंचायत समितीचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ‘प्रशासकीय समिती’ स्थापन करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. निवडणुका पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील सहा महिन्यांसाठी हा प्रशासकराज लागू राहणार आहे.

फलटण तालुक्यातील कोणत्या ग्रामपंचायतीवर कोणाची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

साखरवाडी (पिंपळवाडी) ग्रामपंचायतीवर सौ. अपर्णा दत्तात्रय बोडरे, तांबवे येथे सौ. निलम विशाल गायकवाड, कोळकी येथे सौ. अपर्णा विक्रम पखाले, पिराचीवाडी येथे श्री. दिपक भगवान सावंत, खुंटे येथे श्री. हनुमंत निवृत्ती भिसे, मिलकटी येथे श्री. प्रकाश रामचंद्र गोडसे, जाधववाडी (फ) येथे श्रीम. सिमा आबाजी गायकवाड, अलगुडेवाडी येथे सौ. मंगल संभाजी शिंदे, सोनवडी खुर्द येथे श्रीम. शालन लालासो सूर्यवंशी, तर तिरकवाडी ग्रामपंचायतीवर सौ. अर्चना गंगाराम बनकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सस्तेवाडी ग्रामपंचायतीची धुरा सौ. रेवती गणेश सपताळे यांच्याकडे देण्यात आली असून, कापडगाव येथे लता नंदकुमार करे, निरगुडी येथे कोमल सचिन सस्ते, रावडी बुद्रुक येथे सौ. रसिका अजित घाडगे, वाघोशी येथे श्री. ताराचंद उत्तम पवार, जिंती येथे सौ. मंगल जालिंदर माने, कापशी येथे सौ. गौरी नितीन जाधव, काशीदवाडी येथे सौ. गौरी अमर गोरे, फरांदवाडी येथे रुपाली अश्विन कर्णे, कुरवली बुद्रुक येथे सौ. राणी अनंतकुमार सुळ आणि शिंदे नगर येथे सौ. रुपाली सुनील शिंदे यांनी प्रशासक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

ठाकूरकी ग्रामपंचायतीवर श्री. भानुदास अंतोबा घनवट, नांदल येथे सौ. वृषाली नितीन कोळेकर, सरडे येथे सौ. मंदा सोमनाथ करडे, सांगवी येथे श्री. संतोष लव्हा मोरे, राजुरी येथे श्री. मनोहर ज्ञानदेव पवार, जावली येथे सौ. सुरेखा ज्ञानेश्वर बुधावले, खामगाव येथे सौ. अर्चना नितीन जगताप, हिंगणगाव येथे दिपीका संदीप भोईटे, मुंजवडी येथे सौ. उषा मालोजी येंडे, साठे येथे निलम मिलन खांडेकर, खराडेवाडी येथे श्रीम. कुसुम गणपत खराडे आणि मलवडी ग्रामपंचायतीवर श्री. बाजीराव बबन तरडे यांची प्रशासकपदी वर्णी लागली आहे.

तडवळे येथे श्री. प्रशांत चंद्रकांत खराडे, विचुर्णी येथे राणी बापू चव्हाण, वडगाव येथे सौ. सारिका सुरेश जगताप, निंबळक येथे सौ. सिमा शिवाजी बनकर, मिरढे येथे सौ. रुपाली सतिश मदने, कोरेगाव येथे सौ. उज्वला सुनील शिंदे, मुरूम येथे सौ. प्रियांका योगेश बोंद्रे, भाडळी बुद्रुक येथे श्री. वसंतराव सर्जेराव मुळीक, भाडळी खुर्द येथे मोनिका रविंद्र पिसाळ, टाकळवाडे येथे सौ. आशाताई बापूराव सांगळे, ढवळ येथे श्री. अंकुश ज्ञानदेव लोखंडे, आंदरूड येथे सौ. संध्या सचिन राऊत, रावडी खुर्द येथे श्री. भगवान दादासो होळकर आणि आरडगाव येथे रुपाली अंकुश जाधव हे प्रशासक म्हणून कामकाज पाहतील.

शिंदेवाडी ग्रामपंचायतीवर श्री. आनंदराव भगवान यादव, नाईकबोमवाडी येथे जया पोपट पवार, कांबळेश्वर येथे सौ. भारती शिवाजी भिसे, निंभोरे येथे मोहिनी दिपक चिंचकर, काळज येथे श्री. संजय दादा गाढवे, बिबी येथे सौ. रुपाली महिपती बोबडे, हणमंतवाडी येथे आरती शरद पवार, बोडकेवाडी येथे आशा महादेव ठोंबरे, होळ येथे नजमा दिलावर मेटकरी, सोनगाव येथे सौ. रंजना धनाजी कांबळे, बडजल येथे सौ. स्वाती अमोल पिसाळ आणि फड़तरवाडी ग्रामपंचायतीवर पोर्णिमा प्रेमजीत काटे यांची प्रशासकपदी नेमणूक झाली आहे.

तसेच, आळजापूर येथे सौ. पुष्पा चंद्रकांत पवार, राजाळे येथे सौ. मोनाली हर्षल निंबाळकर, गुणवरे येथे श्री. शिवाजी मारुती गावडे, सोनवडी बुद्रुक येथे सुनिता रामचंद्र मोरे, ढवळेवाडी नि. येथे श्री. दत्तू मुकुटराव माने, झिरपवाडी येथे वर्षा नितीन बोरकर, पवारवाडी येथे सौ. जयश्री दत्तात्रय गावडे, शेरेचीवाडी (हिं) येथे रंजना गणपत कनसे आणि जाधववाडी (ता) ग्रामपंचायतीवर सौ. शारदा दयाराम ठोंगील यांची प्रशासक म्हणून रीतसर नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्व नवनियुक्त प्रशासकांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि संबंधित कायद्यांच्या अधीन राहून प्रशासकीय समितीच्या सल्ल्याने व मान्यतेने ग्रामपंचायतीचे कामकाज करावे, असे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी या आदेशात दिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!