खेड ग्रामपंचायतीसाठी ६८.४६ टक्के मतदान आज मतमोजणी होणार, पाच ग्रामपंचायतींची मतदान प्रक्रिया शांततेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून संभाजीनगर, खेड ग्रामपंचयातीची ओळख आहे. आज रविवार, दि. १८ सप्टेंबर रोजी संभाजीनगर, खेड, खिंंडवाडी, गोजेगाव, उपळे, चिंचणेर स. लिंब या सहा ग्रामपंचायतीची निवडणूक काही बनावट मतदान कार्डचा आक्षेप अपवाद वगळता चुरशीची होऊन शांततेत मतदान झाले. संभाजीनगर येथे ६८.५८ टक्के तर खेड ग्रामपंचायतीमध्ये ६८.४६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सोमवारी सकाळी ९ वा. शाहूस्टेडियमण सातारा येथे मतमोजणी होणार आहे. मतपेटीत उमेदवारांचे भवितव्य बंद झाले असले तरी ग्रामपंचायतीवर वर्चस्व कोणाचे याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

संभाजीनगर ग्रामपंचायतींची निवडणूकीत १७ सदस्यासाठी ३७ उमेदवार तर सरपंच पदासाठी ८ उमेदवारांचे भविष्यात रविवारी मतपेटीबंद झाले आहे. रविवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली. एकूण सहा वॉर्डसाठी ६५00 मतदारापैकी ४३९0 मतदारानी आपला हक्क बजावला. एकूण ६७.५८ % मतदान झाले. येथील विक्रांतनगर मराठी शाळेत वॉर्ड क्र. ४ मध्ये मतदान सुरु असताना तेथील एकजणाने मतदान केंद्राच्या आवारात येवून मतदान आपल्याच उमेदवारास करावे, असे सांगत असल्याचे पोलिसांचे निदर्शनास आल्यानंतर काहीवेळ येथे तणाव निर्माण झाला होता त्यानंतर त्याला समज देवून मतदान केंद्राच्या आवारापासून बाहेर काढले. या निवडणुकीत तीन पॅनेल आमने- सामने उभे होते. तिन्ही पॅनेल खासदार व दोन आमदार यांना मानणारे असल्याने प्रचारापासून शेवटपर्यंत प्रचार शिगेला पोहोचला होता. तिन्ही पॅनेल प्रमुखाना आपलेच पॅनेल लागणार याचा दावा केला आहे.

खेड ग्रामपंचायतीमध्ये सहा वॉर्डमध्ये १७ सदस्यासाठी ३४ उमेदवार तर सरपंचपदासाठी दोन उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले. रविवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली. एकूण सहा वॉर्डसाठी १७ हजार ८९४ जणांचे मतदान मतपेटीत बंद झाले. खेड ग्रामपंचायत निवडणूक ही दुरंगी झाली आहे. मतदान सुरु असताना वनवासवाडी येथे एकाने बोगस मतदानकार्ड आणले होते. ही बाब शासकीय यंत्रणेच्या निदर्शनास येताच तत्काळ अटकाव करण्यात आला. मात्र या घटनेने काही वेळ तणावपूर्ण वातावरण झाले होते. हा अनुचित प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत झाले. येथील ग्रामपंचयात निवडणुकीत आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे यांना मानणारे दोन पॅनेल आहेत. येथील प्रचारही सुरुवातीपासूनच शिगेला पोहोचला होता. मतदान मतपेटीत बंद झाल्यानंतर आता दोन्ही गटाचे पॅनेलप्रमुखांनी आपले पॅनेल लागणार असल्याचा दावा केला आहे.

गोजेगाव येथे एकूण ९५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ८४.४७ टक्के मतदान झाले. उपळी येथे ३४४ मतदारांनी मतदानांचा हक्क बजावल्याने ८७.३१ टक्के मतदान झाले. खिंडवाडी येथे १ हजार ३१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ७२.७५ टक्के मतदान झाले.


Back to top button
Don`t copy text!