6 बाधित कैदी रुग्ण पूर्णपणे बरे; आज दिला डिस्चार्ज; 67 जण विलगिकरण कक्षात दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. २५ : क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे जिल्हा कारागृहातील सहा  कैदी कोविड बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

67 जण विलगिकरण कक्षात दाखल

तसेच क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे 29, ग्रामीण रुग्णालय वाई येथे 38 असे एकूण  67 जणांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन. सी. सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचेही  डॉ. आमोद  गडीकर यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 278 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 151  इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 120 आहे तर मृत्यु झालेले 7 रुग्ण आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!