दैनिक स्थैर्य | दि. ६ मे २०२४ | फलटण |
सद्गुरू संतवर्य शिवाजी महाराज यांचा ५० वा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळा गुरुवार, दि. ९ मे २०२४ ते रविवार, दि. १२ मे २०२४ रोजी श्री सद्गुरू शिवाजी महाराज मठ विडणी, ता. फलटण, जि. सातारा येथे संपन्न होत आहे.
गुरुवार, दि. ९ रोजी सकाळी १०.०० वा. गुरुचरित्र वाचन प्रारंभ, दुपारी १२ वाजता आरती, सायंकाळी ६.०० वाजता हरिपाठ व अखंड विना नामस्मरण प्रारंभ, ७.०० वाजता आरती , संध्याकाळी ९ ते ११ ह.भ.प. योगेश महाराज नाळे दहाबिगे यांचे कीर्तन होईल.
शुक्रवार, दि.१ ० मे २०२४ वैशाख शुद्ध अक्षय तृतीया (मुख्य दिवस) दुपारी १२.०० वाजता श्रींची महाआरती व आरती झाल्यानंतर महाप्रसाद. दुपारी २ ते ५ श्री. योगेशदादा तप्सवी, पुणे यांचे भजन, ६.०० वाजता हरिपाठ, ७.०० वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा सोहळा व सोहळा झाल्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद. रात्री १२.०० वाजता जागरण भजनी मंडळ पुणे यांच्या जागरणाचा कार्यक्रम होईल
शनिवार, दि. ११ मे दुपारी १२.०० वाजता श्रींची आरती कार्यक्रम, दुपारी २.०० ते ५.०० वाजता श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, फलटण यांच्या भजनाचा कार्यक्रम तसेच ६.०० वाजता हरिपाठ, ९.०० ते १२.०० ह.भ.प. विकास निंबाळकर, वाठार निंबाळकर यांचे कीर्तन होईल.
रविवार, दि.१२ मे वैशाख शुद्ध पंचमी सकाळी १०.०० वाजता ह. भ. प. जगताप गुरुजी वाठार यांचे काल्याचे किर्तन होईल. तसेच दुपारी १२.०० वाजता ध्वजारोहण कार्यक्रम व श्रींची आरती व आरती झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद होईल.
या सर्व कार्यक्रमास श्री सद्गुरु शिवाजी महाराज यांच्या भक्तांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटावा, असे आवाहन मठाधिपती श्री. जयवंतराव कर्वे यांनी केले आहे.