श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५०१ फळांचा नैवेद्य


 स्थैर्य, पुणे, दि. 26 : संत्री, मोसंबी, टरबूज, केळी, डाळींब, आंबे, पेरू, चिक्कू, अंजीर ,अननस, लिची अशा विविधरंगी फळांचा नैवेद्य आज श्रीमंत दगडूशेठ गणपतीला दाखविण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात  आज ५०१ फळांची आरास करण्यात आली होती. आजच्या दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे फळे व फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीनिमित्त मंदिरात गणेशयाग देखील झाला. फळे व फुलांच्या आकर्षक सजावटीसोबतच गणेशाला फुलांचा पोशाख देखील करण्यात आला. त्यामध्ये मुकुट, अंगरखा, शुंडाभूषण यासह विविध अलंकार फुलांमध्ये साकारण्यात आले होते. भक्तांनी ट्रस्टचे संकेतस्थळ www.dagdushethganpati.com, फेसबुक, ट्विटर, यु टयूब आणि अ‍ॅप येथे श्रीं चे आॅनलाईन दर्शन घ्यावे,असे कळवण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!