शिरवळ येथून ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० ऑगस्ट २०२२ । खंडाळा । खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीतील एका सोसायटीमधील पार्किंगमधील ५० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली.

या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमधील पळशी रोडवर एक सोसायटी आहे. दरम्यान, शनिवार दि. ६ ऑगस्ट रोजी सदरील सोसायटीमध्ये राहणारे रमेश हणमंत राव हे कंपनीमधून कामावरून आल्यानंतर सोसायटीच्या पार्किंगमध्ये ५० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्रं.एमएच-४७-झेड-१०६३) लावली. यावेळी रविवार दि.०७ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान रमेश राव हे पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी शिरवळ याठिकाणी बाजारपेठेमध्ये जाण्याकरिता घेण्याकरिता गेले असता त्याठिकाणी लावलेली दुचाकी दिसून आली नाही. यावेळी संबंधित दुचाकींचा शिरवळ परिसरामध्ये शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यावेळी सदरील दुचाकी हि अज्ञात चोरट्याने पार्किंगमधून लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची रमेश राव यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला हे करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!