
दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२३ | फलटण |
शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत हणमंतवाडी येथील आठ घरकुल लाभार्थी यांना काल घराकुलासाठी प्रत्येकी ५०० चौ. फूट जमिनीचे वाटप आदेश काढण्यात आले. हे आदेश फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांना जागा मिळवून देण्यासाठी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी स्वतः जातीने लक्ष घालून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांच्या या कामाबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.