दैनिक स्थैर्य । दि.१२ फेब्रुवारी २०२१ । सातारा । शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत दि.१८ एप्रिल २0२१ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार अजित निकम हे त्यांच्या मित्रासोबत बसले होते. या दरम्यान, मोटार सायकलवरुन आलेल्या सहा अनोळखी तरूणांनी फिर्यादीस कोयत्याच्या लाकडी मुठीने मारहाण केली तर त्यांच्या मित्राला हाताने मारहाण करुन जबरदस्तीने त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल, एक मनगटी घडयाळ व रोख रक्कम १ लाख ६२ हजार रुपये असा एकुण १ लाख ७३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला होता. याबाबतचा गुन्हा सातारा तालुका पोलीस स्टेशनला दाखल होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत पाच जणांना अटक करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली.
या गुन्ह्यात सचिन गब्बर भोसले रा. मालगांव ता. सातारा, सध्या रा. इब्राहिमपूर, ता.कोरेगांव, हरिष पिताजी उर्फ मुतखडया शिंदे वय २६ रा. पणदरे म्हसोबावाडी, ता.बारामती, जि.पुणे, शेखर बाळू चव्हाण रा.साखरवाडी ता.फलटण, गणेश शिवाजी कोकरे, रा. पणदरे म्हसोबावाडी, ता.बारामती, जि.पुणे, माकशा रंगा काळे रा.सुरुर ता.वाई अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, उपस्थित होते.
याबाबत पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिलेली माहिती अशी की, दि.१८ एप्रिल २0२१ रोजी शिवथर गावच्या हद्दीत तक्रारदार हे त्यांच्या मित्रासोबत बसले होते. त्यावेळी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या युवकांनी त्यांना व त्यांच्या मित्राला मारहाण करून तसेच कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल, घड्याळ तसेच रोख रक्कम असा एक लाख ७३ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास सातारा तालुका व एलसीबीची पथके करत होती. दरम्यान, गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एलसीबीच्या पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश बर्गे यांच्या पथकाने संशयितांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, फौजदार गणेश वाघ, मधुकर गुरव, मदन फाळके, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार कांतीलाल नवघणे, विश्वनाथ सपकाळ, अतिष घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, प्रविण कांबळे, अजित कर्णे, गणेश कापरे, अमोल माने, विक्रम पिसाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, प्रविण पवार, विशाल पवार, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, शिवाजी भिसे, स्वप्नील माने, नितीन गोगावले, वैभव सावंत, केतन शिंदे, धिरज महाडीक यांनी केली.