दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२१ । सातारा । सातारा आणि जावली तालुक्यातील १७ गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी ४६ लाख १९ हजार रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२१- २२ अंतर्गत हा निधी उपलब्ध झाला आहे.
जावली तालुक्यातील आंबेघर तर्फ मेढा येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ३ लाख ३९ हजार, उंबरीवाडी येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २ लाख ८४ हजार, कुसुंबी येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी १ लाख ३० हजार, गांजे- घरातघर येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २ लाख ८९ हजार, मुकवली- वाहिटे येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ४ लाख ५२ हजार, वरोशी येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ३ लाख ९६ हजार, वाघळी- शेंबडी १ लाख ८ हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सातारा तालुक्यातील कुरुलबाजी- घाटवण येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २ लाख ६१ हजार, चिखली येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २ लाख ६६ हजार, जांभे येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २ लाख ७०, भांबवली येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २ लाख ६४ हजार, धावली येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २ लाख ४९ हजार, पळसावडे येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी १ लाख ९० हजार, पांगारे येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ३ लाख ६० हजार, बोन्डारवाडी येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २ लाख ५६ हजार, रोहोट येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २ लाख ३० हजार आणि सांडवली- केळवली येथील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २ लाख ७५ हजार रूपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून मंजूर कामे वेळेत पूर्ण करा आणि कामे दर्जेदार करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहे.