यवतमाळमध्ये एसटी बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात : 4 जणांचा मृत्यू तर २२ जण जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, यवतमाळ, दि. 19 : लॉकडाऊनमुळे देशातील मजुरांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. कोणी पायी तर कोणी लाकडी गाडी करून आपला गाव जवळ करत आहेत. मात्र यात अनेकांना आपला जीव द्यावा लागत आहे. असाच एक भीषण अपघात यवतमाळमध्ये झाला आहे. या अपघातात मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसने टिप्परला धडक दिल्याने हा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 4 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एसटी ड्रायव्हरचाही समावेश आहे. तर 22 जण जखमी आहेत.

यवतमाळच्या आर्णी नजिकच्या कोळवन गावात हा अपघात झाला. सध्या जखमींवर आर्णीच्य गामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस मजुरांना घेऊन सोलापुरहून झारखंडच्या दिशेनं निघाली होती. आर्णी तालुक्यात पहाटे साडेतीनच्या सुमारास मजुरांच्या बसला हा भीषण अपघात झाला. एसटीने मागून टिप्परला धडक दिली असल्यामुळे एसटीच्या पुढच्या भागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जखमींवर आर्णी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही एसटी सोलापूर येथून मजुरांना घेऊन झारखंडच्या दिशेने जात होती पण दुर्दैवाने वाटेतच हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु असल्यामुळे या रस्त्यावरून टिप्परच्या फेऱ्या सुरु असतात. हा टिप्पर कामाच्या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!