प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे 37 हजार अर्ज रद्द

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य ,पुणे, दि, २९: धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेतील 37 हजार 186 नवीन विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द केले. आवश्‍यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करण्यात आल्यामुळेच अर्ज रद्द करण्याची कारवाई अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने केली आहे.

पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. मुस्लीम, ख्रिश्‍चन, शीख, पारशी, बौध्द, जैन धर्मिय विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्रातील 2 लाख 85 हजार 451 एवढा विद्यार्थ्यांचा कोटा आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी 5 लाख 15 हजार 865 विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदवले होते. त्यातील 3 लाख 476 हजार 570 अर्ज पडताळणीत पात्र ठरले. 67 हजार 658 अर्जांमध्ये चुका असल्याने त्यात दुरुस्त्या सूचवल्या आहेत. 63 हजार 450 अर्जांची शाळास्तरावर वेळेत पडताळणी झालेली नाही.

नूतनीकरणांतर्गत 6 लाख 98 हजार 711 विद्यार्थी पात्र ठरले होते. प्रत्यक्षात 6 लाख 47 हजार 783 विद्यार्थ्यांचेच अर्ज भरण्यात आले होते. यातील 16 हजार 512 अर्ज दुरुस्तीसाठी बाजूला ठेवले. 7 हजार 282 अर्ज रद्द केले. 58 हजार 871 अर्ज शाळास्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित आहेत.

92 हजार 670 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती नाकारण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी शाळा बदलल्यामुळे व इतर शिष्यवृत्तीचा लाभ घेत असल्याने त्यांनाही शिष्यवृत्तीही मिळणार नाही, अशी माहिती अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

या शिष्यवृत्ती योजनेसाठी सर्वाधिक 63 हजार 881 अर्ज अमरावती जिल्ह्यातून दाखल झाले. सर्वात कमी 582 अर्ज गडचिरोलीतून दाखल झाले. पुणे जिल्ह्यातून 13 हजार 677 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 1 हजार 200 अर्ज रद्द झाले असून 1 हजार 302 अर्ज दुरुस्तीअभावी बाजूला ठेवले आहेत.


Back to top button
Don`t copy text!