दैनिक स्थैर्य | दि. ३ एप्रिल २०२४ | फलटण |
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम २५ मधील तरतुदींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा जितेंद्र डुडी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या पूर्व मान्यतेने लोकसभा मतदार संघासाठी मतदान क्षेत्राकरिता किंवा मतदान समुहाकरीता मतदान केंद्र उपलब्ध केली आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
यामध्ये ४३ माढा लोकसभा मतदार संघांतर्गत २५५ – फलटण विधानसभा मतदार संघामध्ये- ३४१, २५८- माण विधानसभा मतदार संघामध्ये- ३६८ मतदान केंद्रे आहेत.