दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑक्टोबर २०२२ । फलटण । ३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा शनिवार २९ ऑक्टोबरपासून घडसोली मैदान फलटण (सातारा) येथे आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात सुरू होतील.
या स्पर्धा भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली दोन नोव्हेंबरपर्यंत चालतील. या स्पर्धेत यजमान महाराष्ट्र, विदर्भ व कोल्हापूरसह देशातील विविध राज्यातील ३२ किशोर व ३२ किशोरीचे संघ भाग घेणार आहेत. महाराष्ट्राचा किशोर गटाचा सलामीचा सामना झारखंड व किशोरी गटाचा सामना उत्तराखंडबरोबर होईल. विदर्भाचे किशोरी मध्यप्रदेशबरोबर, किशोर हिमाचलप्रदेशबरोबर तर कोल्हापूरचे किशोर केरळ बरोबर लढतील.
या स्पर्धेसाठी उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरींना स्व. माजी नगराध्यक्ष अशोकराव देशमुख, किरण विचारे, विजयकुमार खलाटे, माजी नगरसेवक जगन्नाथ कुंभार यांच्या स्मरणार्थ अशी नावे देण्यात आली आहेत. तसेच भव्य अशा प्रवेशद्वारास खो-खोतील कार्यकर्ते स्व. पी. जी. शिंदे यांचे नाव देण्यात आलेले आहे.
महाराष्ट्राच्या दोन्ही संघास महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कीट वाटप करण्यात आले. त्यांनी दोन्ही संघास शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, राज्य सचिव अॅड. गोविंद शर्मा, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा.जनार्दन शेळके, डॉ. प्रशांत इनामदार, सातारा जिल्हा संघटनेचे सचिव महेंद्र गाढवे आदी उपस्थित होते.
स्पर्धेची गटवार विभागणी : किशोर : ए: महाराष्ट्र, ओरिसा, झारखंड, मणिपूर, मेघालय. बी: कर्नाटक, मध्यभारत, चंदीगड, दादर आणि नगर हवेली, नागालँड. सी: हरियाणा, तामिळनाडू, पंजाब, आसाम, पॉंडेचेरी. डी: पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम. ई: तेलंगणा, कोल्हापूर, केरळ, अंदमान निकोबार. एफ: उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, गोवा. जी: राजस्थान, विदर्भ, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा. एच: छत्तीसगड, उत्तराखंड, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर.
किशोरी : ए: महाराष्ट्र, केरळ, उत्तराखंड, मेघालय, नागालँड. बी: पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, मणिपूर, ओरिसा. सी: दिल्ली, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, दादर आणि नगर हवेली, पॉंडेचेरी. डी: राजस्थान, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, गोवा, सिक्कीम. ई: कोल्हापूर, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, चंदीगड. एफ: छत्तीसगड, विदर्भ, मध्य प्रदेश,आसाम. जी: हरियाणा, कर्नाटक, मध्यभारत, अरुणाचल प्रदेश. एच: तामिळनाडू, गुजरात, बिहार, अंदमान निकोबार.
महाराष्ट्र संघ: किशोर: राज जाधव (कर्णधार), जितेंद्र वसावे, हाराद्या वसावे, सोत्या वळवी (सर्व उस्मानाबाद), पार्थ देवकते, वेदांत इनामदार, संग्राम डोंबाळे (सर्व सांगली), आशिष गौतम, ओंकार सावंत (सर्व ठाणे), सुबोध चव्हाण, आदित्य थोरात (सर्व पुणे), अथर्व गराटे (रत्नागिरी), अधिराज जाधव (सातारा), अनिकेत मराठे (औरंगाबाद), गौरव बेंडकोळी (नाशिक). प्रशिक्षक: प्रफुल्ल हाटवटे (बीड), व्यवस्थापक : विनोद मयेकर (रत्नागिरी ), फिजिओ : डॉ. अमित राव्हटे (सांगली)
किशोरी: धनश्री कंक (ठाणे, कर्णधार), धनश्री तामखडे, स्वप्नाली तामखडे, विद्या तामखडे, कृतिका अहिर (सर्व सांगली), प्राची वांगडे (ठाणे), श्वेता नवले, आर्या वाघ (सर्व पुणे), मृणमयी नागवेकर, साक्षी लिंगायत (सर्व रत्नागिरी), संचिता गायकवाड (सातारा), सृष्टी सुतार, मैथिली पवार (सर्व उस्मानाबाद), प्राजकता बनसोडे (सोलापूर), रोहिनी भवर (नाशिक). प्रशिक्षक : अमित परब (ठाणे), सहा. प्रशिक्षक : रफिक शेख (जालना), व्यवस्थापिका : शुभांगी गायकवाड (सातारा)