स्थैर्य, मुंबई, दि २३: सर्वात मोठी ऑनलाईन ऑटोमोबाईल बाजारपेठ असलेल्या ड्रूमने, अलीकडेच वार्षिक ऑटोमोबाईल उद्योगातील कल अहवाल जाहीर केला. हा अहवाल उद्योगातील अंतर्दृष्टी आणि कल या बाबींनी पूर्ण भरलेला असतानाच, वर्ष २०२० मधील ऑटोमोबाइल्सच्या डिजिटल अवलंबनात ३००% वाढ हा सर्वात लक्षणीय कल आहे. कोविड – १९च्या महामारीने या डिजिटल अवलंबन प्रक्रियेस गती मिळाली आहे आणि नवीन कारच्या तुलनेत, वापरलेल्या कार आणि टू-व्हीलर्समध्ये हा बदल अधिक स्पष्ट दिसून आला आहे.
अहवालातील प्रमुख कल पुढीलप्रमाणे:
- कोविड-१९ दरम्यान ड्रूमच्या ऑर्गेनिक आणि डायरेक्ट ट्रॅफिक लीड्ससह ऑटोमोबाईल ऑनलाईनसाठी अवलंबनास गती मिळाली आहे आणि कोविड-१९ नंतर, लिस्टिंग्जच्या संख्येत ३००% पेक्षा अधिक वाढ झाली आहे आणि ही बाब ग्राहकांमध्ये ऑनलाइन उपक्रम वाढल्याचे प्रतिनिधित्व करते.
- सफेद आणि रुपेरी रंगांकरीता भारतीय ग्राहकांमध्ये असलेली मोठी आवड पुन्हा एकदा सिद्ध झाली असून विकल्या गेलेल्या एकूण पूर्वीच्या मालकीच्या कारपैकी ५०% हून अधिक कार या दोन रंगांच्या आहेत.
- भारतीयांद्वारे डिझेलवर चालणा-या कारला प्राधान्य दिले जात असून यात पुन्हा वृद्धी दिसून आली आहे. २०१५ मध्ये विकण्यात आलेल्या पूर्व मालकीच्या कारचे प्रमाण ३५ टक्के होते ते २०२० मध्ये वाढून ६५ टक्के झाले आहे.
- कारच्या मालकीचा सरासरी कालावधी ६ वर्षांचा, बाईक्स आणि स्कूटर्सचा सुमारे ५ वर्षांचा व सुपरबाईकचा साधारण ३ वर्षांचा आहे. दिशानिर्देशानुसार कारच्या मालकीचा सरासरी कालावधी कमी होत असून हे प्रमाण २०१९ मध्ये ६६ महिने होते ते २०२० मध्ये ६० महिन्यांवर आले आहे.
- भारतीय व जपानी मोटारींच्या मूळ उपकरण निर्मात्यां (ओईएम)ची संख्या, पूर्व मालकीच्या एकूण कारपैकी ५५% आहे आणि ही संख्या मर्यादित राहिली आहे. तथापि, जर्मन कारने अधिक मुसंडी मारली आहे आणि विकलेल्या पूर्व मालकीच्या एकूण कारमध्ये १०% पासून २०% वाढ केली आहे आणि कोरियन कार २०% वरून १२% पर्यंत खाली आल्या आहेत.
- ऑटो ट्रांसमिशनच्या अवलंबनात वर्ष २०२० मध्ये अधिक वाढ झाली असून मागील ६ वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास हे प्रमाण २०% वरून ३५% पर्यंत पुढे गेले आहे.
- टू-व्हीलर्समध्ये भारतीय मूळ उपकरण निर्मात्यांनी ५४% मार्केट शेअरसह आणि जपानी मूळ उपकरण निर्मात्यांनी ४२% शेअरसह वर्चस्व गाजविणे चालू ठेवले आहे आणि बाकीच्या जगाचा पूर्व मालकीच्या एकूण टू-व्हीलर्सचा हिस्सा केवळ ४% आहे.
- मारुती सुझुकी स्विफ्ट डिजायर ही बेस्ट सेलिंग पूर्व मालकीची कार आणि हीरो स्प्लेंडर प्लस बेस्ट सेलिंग टू-व्हीलर म्हणून भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे.
ऑनलाइन खरेदीदार आणि विक्रेता उपक्रम आणि त्याच्या मालकीच्या कार्यपद्धतीवर आधारित ड्रूम वार्षिक ऑटोमोबाईल उद्योग कल अहवाल प्रकाशित करते. हा अहवाल १.१ अब्जहून अधिक अभ्यागत, २० हजार + ऑटो डीलर्स, १०८६ शहरे, ३ दशलक्ष लिस्टिंग्ज, ३१५ हजार विकली गेलेली वाहने आणि जीएमव्ही मध्ये विकल्या गेलेल्या ३.१ अब्ज अमेरिकन डॉलर्ससह ड्रूम प्लॅटफॉर्मवरील सूचीबद्ध यादीतील २५ अब्ज अमेरिकन डॉलर्स या बाबींवर आधारित आहे.
ड्रूमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप अग्रवाल यांनी सांगितले की, “ड्रूममध्ये आम्ही, कार खरेदी व विक्रीसाठी एकविसाव्या शतकातील डिजिटल प्लॅटफॉर्म आणि इकोसिस्टम निर्माण करीत आहोत. आमचा एक प्युअर-प्ले ऑनलाइन कंपनीकडे कल आहे आणि ऑटोमोबाईलसाठी खरेदीदार, विक्रेते, लिस्टिंग्ज, ब्रँड, वर्ष आणि शहरे यावर आमच्याकडे प्रचंड डेटाबेस आहे. ऑटोमोबाईल उद्योग बिरादरीसह या डेटामधील शीर्ष अंतर्दृष्टी सामायिक करण्यास नेहमी मोठा आनंद होतो.”