ब्रेनलीच्या एआय-सक्षम मॅथ सॉल्व्हरचा ३.८ दशलक्ष विद्यार्थ्यांकडून वापर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ जानेवारी २०२२ । मुंबई । आधुनिक काळातील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेत ऑनलाइन अध्ययन व्यासपीठ ब्रेनलीने २०२१ च्या सुरूवातीला भारतामध्ये मॅथ सॉल्व्हर लाँच केले. हे एआय-सक्षम २४/७ साधन युजर्सना सर्वात अवघड गणित उदाहरणांचे सोल्यूशन्स शोधण्यामध्ये मदत करते. तेव्हापासून ब्रेनली मॅथ सॉल्व्हर ब्रेनलीच्या भारतातील युजर्ससाठी अपरिहार्य साधन बनले असून भारतामध्ये ३.८ दशलक्षहून अधिक विद्यार्थ्यांनी अवघड गणित उदाहरणे सोडवण्याकरिता याचा वापर केला आहे.

२०२१ मध्ये या व्यासपीठाने दररोज ३०,००० हून अधिक फोटोजची प्रक्रिया केली, स्नॅप टू सॉल्व्ह वैशिष्ट्याच्या माध्यमातून अवघड गणित उदाहरणांसाठी पायरी-पायरीनुसार मार्गदर्शन केले. उल्लेखनीय बाब म्हणजे ब्रेनली मॅथ सॉल्व्हरच्या एआय-सक्षम प्रक्रियेला प्रश्न स्कॅन करण्यापासून सोल्यूशन देण्यापर्यंत फक्त २.५ सेकंद लागतात.

ब्रेनली येथील सीपीओ राजेश ब्यासनी म्हणाले, “गणित हा अनोखा विषय आहे, जो विद्यार्थी व पालकांना क्लिष्ट वाटतो. हायब्रिड पद्धत भावी अध्ययन बनत असल्‍यामुळे ब्रेनली मॅथ सॉल्व्हर घरातून शिक्षण घेण्यामध्ये साह्य करण्यासोबत विद्यार्थ्यांना पायरी-पायरीने स्पष्टीकरण व ग्राफिक व्हिज्युअल्ससह संकल्पना व सोल्यूशन्स समजण्यामध्ये देखील मदत करेल. ब्रेनली मॅथ सॉल्व्हरच्या पहिल्या वर्षामध्ये आशादायी निष्पत्ती दिसून आल्या आहेत. आम्ही आगामी वर्षांमध्ये देखील लाखो विद्यार्थ्यांना साह्य करत राहण्यास उत्सुक आहोत.”


Back to top button
Don`t copy text!