स्थैर्य, सातारा, दि. ३: टोकियो ऑलिंपिकसाठी क्वालिफाय केलेल्या दीपक पूनियासह तीन भारतीय पैलवानांना कोरोनाची लागण झाली आहे. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) ने गुरुवारी याची पुष्टी केली. हे सर्व पैलवान हरियाणातील सोनीपत साई सेंटरमध्ये 1 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या रेसलिंग नॅशनल कँपमध्ये सामील होते.
दीपकने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल जिंकले आहे. दीपकसोबत नवीन आणि कृष्णादेखील कोरोना संक्रमित आढळले आहेत. पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
विनेश फोगाट आणि रेसलिंग कोच संक्रमित
नुकतंच इंटरनेशनल रेसलर विनेश फोगाट आणि कोच ओमप्रकाश दहिया यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघेही सध्या क्वारंटाइन आहेत. विनेशला यावर्षी खेळरत्न आणि ओमप्रकाश यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे. दोघांना राष्ट्रपतींच्या हस्ते 29 ऑगस्टला क्रिडा दिनी व्हर्चुअल कार्यक्रमात सन्मानित करणार होते, पण संक्रमित असल्यामुळे कार्यक्रमात सामील होऊ शकले नाहीत.
हॉकीचे 6 खेळाडू संक्रमित
मागच्या महिन्यात बंगळुरुच्या नॅशनल हॉकी कँपमध्ये भारती कर्णधार मनप्रीत सिंगसह 6 खेळाडू कोरोना संक्रमित आढळले आहेत. परंतू, उपचारानंतर सर्वजण ठीक झाले. या खेळाडूंमध्ये फॉरवर्ड मंदीप सिंह, डिफेंडर सुरेंद्र कुमार, जसकरन सिंह, ड्रैग-फ्लिकर वरुण कुमार आणि कृष्ण बी पाठक सामील होते.
पुढच्या वर्षी टोकियो ऑलिंपिक
टोकियो ऑलिंपिक यावर्षी जुलैमध्ये होणार होते. परंतू, कोरोनामुळे याला रद्द करण्यात आले. आता हा इवेंट 2021 मध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होईल.