स्थैर्य, सातारा, दि. २६ : येथील राधिका रोडवरील विमल रॉयल सिटीसमोर रास्ता राको करताना जमाव जमवून कोवीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 29 जणांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, राधिका रोड येथील विमल रॉयल सिटीसमोर रास्ता रोको सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी पोलिसांनी जावून पाहिले असता विमल रॉयल सिटी सोसायटीतील लोकांनी रास्ता रोको केल्याचे दिसून आले. याबाबत माहिती घेतली असता जागा मालक बलदेवसिंग जगन्नाथ परदेशी हे विमल रॉयल सिटी सोसायटीच्या गेटकडील त्यांच्या मालकीच्या रस्त्यावर खोदकाम करून सभासदांचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद करत असल्याचे सोसायटीतील लोकांनी सांगितले. याबाबत बलदेवसिंग परदेशी यांना विचारणा केली असता त्यांनी या जागेत कोर्टानेच सभासदांना येण्यास मनाई केली असून खोदकाम करत असलेली जागा त्यांचे मालकीची आहे, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून वाद झाल्याने पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दोन्ही बाजूकडील लोकांना बोलावून घेवून कायदेशीर म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी जागेबाबत दिवाणी न्यायालय सातारा यांचे कोर्टात दावा सुरू असून सोसायटीने दाखल करण्यात आलेल्या निशाणी 5 चे अर्जावर निर्णय देताना कोटांने प्रथमदर्शनी बलदेवसिंगा परदेशी यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे व दोन्ही पक्षांना पो.नि.पतंगे यांनी सीआरपीसी कलम 149 प्रमाणे शांतता ठेवण्याबाबत नोटीसा दिलेल्या होत्या.
कोर्टाचा असा निर्णय असताना विमल रॉयल सिटी सोसायटीतील विनायक गुलाबराव रणदिवे वय 52, दिपकसिंह नारायणसिंह रजपुत वय 50, प्रणित सातपुते वय 30, अजित शिवाजी पवार वय 41, पाडुरंग दगडू कदम वय 76, मस्जिद अब्बास शिकलगार वय -62, मिलिंद शिवाजीराव जगताप वय 49, फ्रँकरी डिसोझा वय 40, बाबासाहेब एकनाथ तुपे वय 51, नारायण सिंग रजपुत,वय 80, संदीप भानुदास साबळे, प्रमोद रामचंद्र मोघे वय 71, जितेंद्र काशीनाथ जाधव वय 49, निखिल प्रकाश शहा वय 37, संगीता जितेंद्र जाधव वय 48, मंगल धनाजीराव कदम वय -53, कविता शशीकांत खोपडे वय 38, सारीका संदिप जगदाळे वय 38, सुनिता मिलींद जगताप वय 45, अस्मिता अजित पवार वय 39, सुनंदा दिनकर सुर्यवंशी वय 66, प्रेरणा निखील शहा वय 35, ज्योती प्रकाश शहा वय 58, अनघा प्रमोद मोघे वय 65, लता सुधिर पाटील वय 40, मुक्ता हणमंत धनावडे वय 50, सुषमा आनंद कदम बय 47, फरजाना असिफ सय्यद वय 48, अनिता सुनिल वायदंडे वय 47 सर्व रा. विमल रॉयल सिटी राधिका रोड करंजे तर्फ सातारा यांनी कोवीड 19 च्या अनुशंगाने जमाव बंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. याप्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.