27 जण कोरोनाबाधित तर 25 जण कोरोनामुक्त होवून गेले घरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २३ : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 1, कोविड केअर फलटण येथील 2, कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथील 8, बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथील 6, कोविड केअर केंद्र खावली येथील 6, कोविड केअर केंद्र वाई येथील 1, कोविड केअर केंद्र ब्रम्हपुरी येथील 1 असे एकूण 25 रुग्णांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचबरोबर आज 27 जण कोरोनाबाधित निष्पन्न झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

आज घरी सोडणार्यांमध्ये कृष्णा हॉस्पिटल, कराड येथील कराड तालुक्यातील वडगांव (उंब्रज) येथील 86 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 51, 50 व 35 वर्षीय पुरुष, केसे येथील 64 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील उरुल येथील 26 वर्षीय पुरुष, जांभेकरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, नवसारी येथील 55 वर्षीय पुरुष. तर बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथील जावली तालुक्यातील भणंग येथील 24 वर्षीय युवती व  21 वर्षीय युवक,ओझरे येथील 5 वर्षीची बालिका, 25 वर्षीय महिला व 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. धोंडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष. कोविड केअर केंद्र, ब्रम्हपुरी येथे दाखल असणार्यांमध्ये कोरेगाव तालुक्यातील साप येथील 39 वर्षीय पुरुष कोविड केअर केंद्र, वाई येथे दाखल असणार्यांमध्ये वाई तालुक्यातील बावधन नाका येथील 25 वर्षीय पुरुष. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे दाखल असणार्यांमध्ये जावली तालुक्यातील धोंडेवाडी येथील 57 वषीय पुरुष. कोविड केअर केंद्र, खावली येथे दाखल असणार्यांमध्ये सातारा तालुक्यातील समर्थ नगर येथील 19 वर्षीय युवक, देगाव येथील 55 वर्षीय पुरुष, शाहूपुरी येथील 58 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला 8 वर्षीय मुलगी, सैदापूर येथील 37 वर्षीय पुरुष. कोविड केअर केंद्र, फलटण येथे दाखल असणार्यांमध्ये फलटण तालुक्यातील वडले येथील 24 व 52 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

दरम्यान, आज सकाळी 27 नागरिकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यामध्ये सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या सातारा तालुक्यातील वडुथ येथील 63 वर्षीय पुरुष कोविड बाधित असल्याचे संबंधित हॉस्पिटलने कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

यामध्ये जावली तालुक्यातील गांजे येथील 24 वर्षीय पुरुष, म्हातेखुर्द येथील 38 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगा. कराड तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय 2 पुरुष व 24 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 40 वर्षीय पुरुष. कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथील 44 वर्षीय पुरुष.

पाटण येथील गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला, बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, आचरेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष. फलटण येथील रविवार पेठ येथील 3 वर्षीय बालक व तालुक्यातील कोरेगाव येथील 26 वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40 व 56 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचे बालक, म्हासूर्णे18 वर्षीय तरुणी. सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 49 वर्षीय 2 महिला व 16 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

171 जणांचा अहवाल आला निगेटिव्ह

काल रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांचेकडून 171 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.

248 जणांचे नमुने पाठविले तपासणीला क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 17, कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथील 30, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 77, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 2, शिरवळ येथील 12, पानमळेवाडी येथील 16, मायणी येथील16, महाबळेश्वर येथील5, पाटण येथील24, दहिवडी येथील 49 असे एकूण 248 जणांच्या नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!