कृष्णानगर येथून २६ हजाराचा ऐवज चोरीस


दैनिक स्थैर्य । दि.१० मार्च २०२२ । सातारा । येथील कृष्णानगर येथील धोम पाटबंधारे उपविभाग क्रमांक दोनच्या कार्यालयातील संगणक, मॉनिटर, सीपीयु असा सुमारे २६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. चोरट्याने कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर साहित्य चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचारी कार्यालयात आले, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत अरुण भिसे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!