स्थैर्य, सातारा दि. 7: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 252 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1007 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
1007 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10,उपजिल्हा रुग्णालय कराड 40, उपजिल्हा रुग्णालय फलटण 105, कोरेगाव 46, वाई 62, खंडाळा 135, रायगांव 68, पानमळेवाडी 107, मायणी 89, महाबळेश्वर 70, दहिवडी 43, खावली 40, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 192 असे एकूण 1007 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने –50577
एकूण बाधित — 18988
घरी सोडण्यात आलेले — 11029
मृत्यू — 513
उपचारार्थ रुग्ण –7446