
दैनिक स्थैर्य | दि. 20 एप्रिल 2023 | फलटण | फलटण बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 14 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर 81 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. यामध्ये विरोधकांनी आपले काही अर्ज ठेवल्याने बाजार समिती बिनविरोध झाली नाही.
तर फलटण बाजार समितीसाठी एकूण 4 जागा बिनविरोध झाल्या असून त्यामध्ये ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदारसंघातुन अक्षय शामराव गायकवाड, हमाल मापाडी मतदारसंघातुन निलेश कापसे, सोसायटी इतर मागास मतदारसंघातून तुळशीदास शिंदे, ग्रामपंचायत आर्थिक मागास मतदारसंघातुन संतोष जगताप यांची बिनविरोध संचालक म्हणून बाजार समितीवर निवडून गेले आहेत.