रिव्होल्ट कंपनीची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने २३.५० लाखाचा गंडा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२१ । सातारा । रिव्होल्ट कंपनीची एजन्सी देतो, असे सांगून सातारा शहरालगत असणाऱ्या शाहूपुरी परिसरातील एकाची दीड महिन्यांच्या कालावधीत २३ लाख ५0 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जैन आणि अशोक शर्मा (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती.

याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, नरेंद्र सर्जेराव कदम (वय ४२, रा. ४0५, शिवालय अपार्टमेंट, शाहूपुरी पोलीस ठाण्याजवळ, मोळाचा ओढा, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते स्वत: नोकरी करतात. त्यांच्याशी जैन या व्यक्तीने ८३३४८५९२६२ या मोबाईल क्रमांकावरुन तर अशोक शर्मा याने ८१४४८२३६४२ या मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधला आणि आम्ही रिव्होल्ट कंपनीतून बोलत असे सांगत तुम्हाला रिव्होल्ट कंपनीची डिलरशीप देणार असल्याचे सांगितले. यानंतर नरेंद्र कदम यांनी दि. २ ऑगस्ट ते दि. १५ सप्टेंबर २0२१ या कालावधीत वेळोवेळी २३.५0 लाख रुपये घेतले आहेत. हे पैसे त्यांनी पंजाब नॅशनल बँकेत जमा केले आहेत. दरम्यान, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच कदम यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर जैन आणि अशोक शर्मा या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!