दैनिक स्थैर्य | दि. ६ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचा २१ वा वर्धापनदिन सोमवार, दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सत्यनारायण पूजन, संस्थेच्या ध्वजाचे पूजन, वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम यांनी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचा २० वर्षाचा प्रगतीचा आढावा सादर केला. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील शेतकर्यांच्या मुलांना कृषी व उद्यानविद्या क्षेत्रातील शिक्षण घेता यावे, या उद्देशाने ४ नोव्हेंबर २००३ रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत फलटण येथे उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यात आले, २००३ पासून आजपर्यंत कृषी व उद्यानविद्या क्षेत्रात विकासाच्या व प्रगतीच्या अनेक पायर्या या महाविद्यालयाने चढल्या आहेत. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयात उद्यानविद्या शास्त्राशी संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवला जातो. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना उद्यानविद्या व कृषी क्षेत्रामधील शिक्षण, नवनवीन कृषी संशोधन व तंत्रज्ञान संबंधित व्यावसायिक मार्गदर्शन, कृषी उद्योजकता विकास व व्यवसाय, प्रगतशील शेती तसेच प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच महाविद्यालयातील बर्याच माजी विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्रासंबंधित व्यवसाय, रोजगार व उच्चतम अधिकारी पदावर निवड झाली आहे.
महाराष्ट्रातील शेतीसंबंधित व्यवसाय व उद्योगधंदे, प्रगतशील शेती तंत्रज्ञानात व प्रशासकीय सेवेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अधिकतम सहभाग व्हावा, यादृष्टीने महाविद्यालय कायम प्रयत्नशील व अजून महाविद्यालयाची प्रगती व विकास कसा होऊ शकतो यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सदैव प्रयत्नशील आहेत. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी शिस्त व हेतू बघता महाविद्यालयास उच्चतम शिखरावर नेऊ, असा विश्वास दिला आहे.
या कार्यक्रमाला मे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य श्री. रणजित निंबाळकर, श्री. शिरीषशेठ दोशी, स्कूल कमिटीचे निमंत्रित सदस्य श्री. राजाभाऊ पवार, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण उपस्थित होते.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषद, सातारचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, मे. गव्हर्निंग काँसिलचे सभासद सदस्य, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.