श्रीमंत विश्‍वजीतराजेंना सभापतीपद मिळाल्याबद्दल दगडूशेठ गणपतीला 21 नारळ अर्पण


दैनिक स्थैर्य । दि. 08 डिसेंबर 2021 । फलटण । श्रीमंत विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर यांना फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी संधी मिळावी याकरिता कोळकी येथील युवा उद्योजक रूपेश नेरकर यांनी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घातले होते. त्यानंतर श्रीमंत विश्‍वजीतराजे सभापतीपदी विराजमान झाल्यावर रुपेश नेरकर यांनी दगडूशेठ गणपतीला 21 नारळ अर्पण करुन आपले साकडे पूर्ण केले आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत राजे गटाचे युवा कार्यकर्ते प्रितसिंह खानविलकर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!