भक्तांविना साईबाबांचा गाभारा सुना, मात्र देणग्यांचा ओघ कायम; लॉकडाऊनच्या साडेपाच महिन्यांत झोळीत 21 कोटी रुपयांचे दान


स्थैर्य, शिर्डी, दि.१०: कोरोनाच्या दुष्टचक्रात बाजारपेठा बंद राहिल्या, मंदिरे भक्तांविना ओस पडली. मात्र शिर्डीमध्ये साईबाबा समाधी मंदिराकडे येणारा देणगीचा ओघ सुरूच आहे. यंदा लॉकडाऊनच्या काळात १७ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत साई संस्थानला साईभक्तांकडून विविध माध्यमांतून २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये देणगी प्राप्‍त झाली. गेल्या वर्षी प्राप्त देणगीचा विचार करता ही रक्कम अत्यल्प आहे. गतवर्षी याच कालावधीत तब्बल २०३ कोटी ३७ लाख ७१,७९५ रुपये देणगी मिळाली होती. म्हणजेच यंदा देणगीमध्ये १८२ कोटी ६१ लाख १७,६४४ रुपये इतकी घट झाली. कोरोनाचा संसर्ग देशात सुरू झाल्यानंतर या महामारीला अटकाव करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात आले. यात राज्य व केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांनुसार टप्पेवार लॉकडाऊन सुरू झाले. याच दरम्यान शिर्डी संस्थानने १७ मार्चपासून साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. दक्षिणापेटीत येणारी देणगी रक्कम मिळालीच नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!