दैनिक स्थैर्य | दि. 10 जुन 2024 | फलटण | दहावी, बारावीचे निकाल झाल्यानंतर लगबग सुरू होते ती ऍडमिशनची आणि आता जवळपास सर्वच ऍडमिशनसाठी विविध शासकीय दाखले त्यामध्ये उत्पन्न, जातीचा, डोमासाईल, EWS, अल्पभूधारक शेतकरी असे दाखले लागत असतात. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येवू नये म्हणून फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी परफेक्ट नियोजन करत 3 दिवसांमध्ये 2000 पेक्षा जास्त दाखले जारी केले आहेत. व आगामी काळात सुद्धा वेळेत दाखले जारी करणार असल्याची ग्वाही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी निकाल लागला असून आता विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरु झाली आहे. बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांबाबत माहिती नसते. आणि आयत्या वेळी दाखले काढण्यासाठी धावपळ होते. कारण प्रवेशासाठी सुद्धा विद्यालयांद्वारे ठराविक कालावधीचा अवधी देण्यात येतो. आयत्या वेळी जरी धावपळ झाली तरी सुद्धा वेळेत ऍडमिशन व्हावे व विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेतला असल्याचे बघायला मिळत आहे.