स्थैर्य, फलटण दि.१: फलटण तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी तब्बल 2 हजार 408 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली. छाननीमध्ये सदर अर्जांमधील 26 अर्ज अवैध ठरले त्यामुळे 2 हजार 382 उमेदवार रिंगणात असून आता अखेरपर्यंत कोण निवडणूकीच्या रिंगणात राहतो आणि कोण मुदतीत आपले अर्ज मागे घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान काशिदवाडी व डोंबाळवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर अनेक ग्रामपंचायतीमधील काही जागाही बिनविरोध झाल्या आहेत.
दि.30 (बुधवार) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या अखेरच्या दिवशी 1हजार 490 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होती. दि.31 रोजी सकाळपासून छाननी प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या छाननीत 26 जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले.
गावनिहाय सदस्य संख्या व दाखल उमेदवारी अर्ज खालीलप्रमाणे – राजाळे 13( 62), सोनगांव 9 (32), धुळदेव 9(50), अलगुडेवाडी 9(29), सांगवी 13( 40), टाकळवाडे 9(38), कांबळेश्वर 9(32), तावडी 7( 19), निरगुडी 11( 2), विंचुर्णी 7(15), धुमाळवाडी 7( 22), बोडकेवाडी 7( 9) सासकल 9(29), भाडळीं बु॥ 7(23), भाडळीं खु॥ 7(24), तिरकवाडी 7( 19), सोनवडी बु॥ 7(17), सोनवडी खु॥ 7(17), आळजापूर 9(35), शेरीचीवाडी हिं. 7(13), बिबी 9( 32), कोर्हाळे 7( 10) वडगांव 7( 8), हिंगणगांव 11( 35), घाडगेवाडी 7( 25), कापशी 7( 26), वाघोशी 7( 8), कापडगाव 9( 26), कोरेगाव 7(20), आरडगाव 7 (18), तांबवे 9(20), जिंती 11( 23), रावडी खु॥ 7(17), रावडी बु॥ 9( 26), भिलकटी 7(19), पिंपळवाडी 17(69), तडवळे 9(11), डोंबाळवाडी 7(7), खराडेवाडी 9(20), काळज 9(38), होळ 9(23), मुरुम 9(26), खामगाव 11(38), फडतरवाडी 9( 33), कोळकी 17( 93), जाधववाडी फ 11( 30), झिरपवाडी 9( 35), निंभोरे 9( 43), ढवळेवाडी निं 7( 17), काशीदवादी 7(7), वडजल 7( 25), सस्तेवाडी 11(41), खुंटे 9(31), शिंदेवाडी 9(48), ठाकुरकी 9(23), फरांदवाडी 9( 37), नांदल 9(36), मुळीकवाडी 7( 17) घाडगेमळा 7(13), वाखरी 9( 49), ढवळ 11(43), मलवडी 9(31), पिराचीवाडी 7(18), शेरीचीवाडी ढ 7(22), सरडे 11( 42), साठे 9(23), शिंदेनगर 7(32), पवारवाडी 11( 54), हनुमंतवाडी 9(42), गुणवरे 15( 56), जाधववाडी ता 7(23), मुंजवडी 9( 53) निंबळक 13,(45), जावली 9(35), राजुरी 11 (59), आंदरुड 9(25), कुरवली बु॥ 9(38), नाईकबोमवाडी 7 (20), मिरढे 9(16), शेरेशिंदेवाडी 7(14).
उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 4 पर्यंत आहे. त्यामुळे इच्छुकांनी अन्य उमेदवारी दाखल केलेल्यांनी आपले अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यानंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.