आज 2 जणांना सोडले घरी; 148 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

ओझरे येथील 75 वर्षीय बाधित  पुरुषाचा उपाचारा दरम्यान मृत्यू

स्थैर्य, सातारा दि. 23 : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा दाखल असलेल्या  स्टाफ नर्स, खिंडवाडी सातारा येथिल 44 वर्षीय महिला व कोविड केअर केंद्र खावली येथील दाखल असलेल्या निशिगंधा कॉलनी बारवकर नगर, सातारा येथील 42 वर्षीय पुरुष असे एकूण 2 रुग्णांना  आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

148 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातरा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 36, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 14, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 8, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 6, वाई  11, शिरवळ 13, पानमळेवाडी 3, दहिवडी 39 असे एकूण 148 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू 

तसेच दि. 2 जून रोजी मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या ओझरे ता. जावली येथील 75 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!