गुणवरे येथील ब्लूम इंग्लिश मिडीयम अँड ज्युनिअर कॉलेजमधील पहिली ते चौथीचे वर्ग सुरु; शासनाच्या सर्व नियमांचे पालन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील गुणवरे येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयातील इयत्ता पहिली ते चौथी चे वर्ग शासन आदेशाप्रमाणे आज १ डिसेंबर पासून प्रत्यक्षात सुरू झाले. ऑफलाइन शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व मास्क देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी रमेश सस्ते व गिरिधर गावडे यांनी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करून स्वतः सुरक्षित राहून इतरांना कसे सुरक्षित ठेवाल यासंबंधी मार्गदर्शन केले. कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद असलेल्या शाळा आता सुरू झाल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोरोनाचा संसर्ग अजूनही पूर्णपणे कमी न झाल्यामुळे सर्व नियम व अटी पाळून शाळेत अध्ययन अध्यापनाचे काम चालू आहे. शाळेत सध्या नर्सरी, LKG, HKG वर्गांचे ऑनलाइन पद्धतीने व पहिली पासून पुढील वर्गाचे ऑफलाइन पद्धतीने वर्ग सुरू आहेत. संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे व अध्यक्ष ईश्वर गावडे यांनी शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक पहिली ते बारावी चे विद्यार्थी व पालक कोरोनाचे नियम पाळून शाळेत उपस्थित होते. यावेळी प्राजक्ता ठोंबरे व माधुरी बनकर यांनी या सुद्धा उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!