कपिल देव यांना हार्ट अटॅक : 1983 क्रिकेट वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव यांच्या छातीत दुखल्यानंतर रुग्णालयात केले दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.२३: भारतीय क्रिकेट टीमला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांना हार्ट अटॅक आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, छातीत वेदना झाल्यानंतर शुक्रवारी त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हार्टमध्ये ब्लॉकेज असल्यामुळे कपिल देव यांची एंजियोप्लास्टी झाली आहे.

डॉक्टरांनुसार, कपिल देव यांची प्रकृती आता स्थिर आहे. ते धोक्याच्या बाहेर आहे. हार्ट अटॅकच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर हर्षा भोगले आणि आकाश चोपडांसह अनेक चाहत्यांनी त्यांनी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.

1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकवले


माजी ज्येष्ठ ऑलराउंडर कपिल देव यांनी कर्णधार असताना भारताने 1983 मध्ये पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल यांनी 131 टेस्टमध्ये 5248 आणि 225 वनडेमध्ये 3783 रन बनवले आहेत. त्यांनी टेस्टमध्ये 343 आणि वनडेमध्ये 253 विकेटही घेतल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!