विजेचा धक्का लागून सोनगाव येथे १८ वर्षीय युवकाचा मृत्यू; मसाले भाताची पार्टी जीवावर बेतली


दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२२ । सातारा । मित्रांसमवेत मसाले भाताची पार्टी करण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा विहिरीतून पाणी आणत असताना विजेता धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना रविवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली यश गणेश चिकणे असे या मृत तरुणांचे नाव आहे जावळी तालुक्यातील सोनगाव येथे ही घटना घडली या घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की यश चिकणे हा लहान भाऊ आयुष चिकणे यांच्यासह संकेत चिकणे सत्यम चिकणे विशाल पवार, कुणाल चिकणे सर्वजण रा . सोनगाव ता जावळी हे काल रविवारी दुपारी मसाले भाताची पार्टी करण्यासाठी आरडे नावाच्या शिवारात गेले होते या ठिकाणी शिवारात उमेश काटकर यांची विहीर आहे मसालेभात करण्यासाठी यश पाणी आणण्यासाठी गेला होता .

विहिरीच्या लोखंडी गजाच्या पायरीवर त्याने पाय ठेवला असता त्याला विजेचा धक्का लागून तो पाण्यात पडला आणि विहिरीच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला याबाबतची फिर्याद किरण तुकाराम चिकणे यांनी मेढा पोलीस ठाण्यात दिली आहे अधिक तपास पोलीस नाईक शेख करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!