फलटण तालुक्यात 33 ग्रामपंचायतींसाठी 173 उमेदवारी अर्ज दाखल : आगामी दोन दिवसात गर्दी वाढणार


स्थैर्य, फलटण दि. ३० : ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठी काल (दि.28) 33 ग्रामपंचायतींसाठी 173 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती नायब तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठी दि. 23 ते 30 डिसेंबर अखेर उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे असून दि. 23 व 24 डिसेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तर दि. 25, 26 व 27 डिसेंबर रोजी सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत.फलटण तालुक्यात 80 ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूका जाहीर झाल्या आहेत.
काल दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये गावे व त्यापुढे दाखल उमेदवारी अर्जांची संख्या खालीलप्रमाणे आहे.
राजुरी 11, बिबी 9, घाडगेवाडी 11, धुळदेव 4, सांगवी 8, कांबळेश्‍वर 3, निरगुडी 7, सासकल 1, सोनवडी बु॥ 1, सोनवडी खु॥ 2, रावडी बु॥ 2, पिंपळवाडी 9, काळज 1, फडतरवाडी 3, कोळकी 10, जाधववाडी फ 5, झिरपवाडी 1, निंभोरे 8, वडजल 9, सस्तेवाडी 7, खुंटे 1, शिंदेवाडी 3, फरांदवाडी 1, मुंजवडी 11, नांदल 2, वाखरी 6, मलवडी 6, साठे 7, शिंदेनगर 1, निंबळक 12, जावली 5, आंदरुड 5, शेरेशिंदेवाडी 1.

Back to top button
Don`t copy text!