173 बेवारस वाहनांच्या मालकांनी त्यांची वाहने घेवून जाण्यासाठी आवाहन


स्थैर्य, पुणे दि.5 : पुणे शहरात वाहतुक शाखेस 173 वाहने जमा  असलेली वाहने ही पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथे जमा आहेत. या 173 बेवारस वाहनांच्या मालकांनी त्यांची वाहने पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे या ठिकाणी समक्ष हजर राहून ओळखून घेवून जावीत.

ही वाहने 4 दिवसात ओळखून न नेल्यास या वाहनांवर बेवारस वाहने या सदराखाली लिलावाची कार्यवाही करण्यात येईल, असे येरवडा वाहतुक विभाग, पुणे शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी कळविले आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!