171 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

बाधित महिलेसह अन्य एका महिलेची शस्त्रक्रीयेद्वारे सुरक्षीत प्रसुती तर 54 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

स्थैर्य, सातारा दि. 25 : एन.सी.सी.एस पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्या प्राप्त अहवालानुसार एकूण 171 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत , अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

बाधित महिलेस अन्य एका महिलेची शस्त्रक्रीयेद्वारे सुरक्षीत प्रसुती

काल दि. 24 मे रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे बाधित 24 वर्षीय महिलेचे सिझेरियन ऑपरेशनद्वारे सुरक्षीत प्रसुती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत.  तसेच आज पहाटे 3.30 वाजता कंटेन्मेंट झोन  भिमनगर, कोरेगाव येथील 22 वर्षीय महिलेची सिझेरियन ऑपरेशनद्वारे सुरक्षीत प्रसुती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुरक्षित असून आईच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

54 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

काल दि. 24 मे रोजी रात्री उशिरा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 46 व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथे 8 असे एकूण 54 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुना एन.सी.सी.एस, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!