
थेट WhatsApp वर मिळवा

जिल्ह्यात आत्तापर्यंत करोना बाधित २०१
स्थैर्य सातारा दि. 21 : संस्थात्मक अलगीकरणात दाखल असलेला मुंबई येथून आलेला भीमनगर ता. कोरेगांव येथील 27 वर्षीय युवक, संस्थात्मक अलगीकरणात असलेला मायणी ता. खटाव येथील 64 वर्षीय पुरुष, इंजिनिअरींग कॉलेज संस्थात्मक अलगीकरणात असलेला धामणी ता. पाटण येथील निकट सहवासीत 72 वर्षीय पुरुष, इंजिनिअरींग कॉलेज संस्थात्मक अलगीकरणात असलेला शामगाव, कराड येथील निकट सहवासीत 24 वर्षीय पुरुष, वरोशी ता. जावली येथील निकट सहवासीत 52 वर्षीय महिला, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथे दाखल असलेले मोजावाडी ता. खटाव येथील 53 वर्षीय पुरुष सारीचा रुग्ण, मुंबई येथून आलेला आसेर ता. वाई येथील 50 वर्षीय पुरुष, गारवाडी ता. खटाव येथील निकट सहवासीत 21 वर्षीय महिला, मुंबई येथून आलेला फलटण येथील 63 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली फलटण येथील 58 वर्षीय महिला, रायघर ता.सातारा येथील निकट सहवासीत 26 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला कासखुर्द येथील 24 वर्षीय पुरुष, आसनगाव ता. सातारा येथील निकट सहवासीत 36 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला निमसोड ता. खटाव येथील 20 वर्षीय व 48 वर्षीय पुरुष, खापर खैरणे मंबई येथून आलेला गावडी ता. जावली येथील 19 वर्षीय पुरुष असे एकूण 16 जणांचा अहवाल कोरोना बाधीत आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


