दैनिक स्थैर्य | दि. १९ जून २०२३ | फलटण |
उपळवे (ता. फलटण) येथील ‘स्वराज ग्रीन पॉवर अॅण्ड फ्यूल लिमिटेड’ या साखर कारखान्याबरोबर गेल्या दोन गळीत हंगामात अनेक ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांनी करार केले होते. मात्र, त्यातील अनेकजणांनी कराराचे उल्लंघन करत कारखान्याला ऊस वाहतूक न करता तसेच करारातील वाहन न पुरविता कारखान्याची आर्थिक फसवणूक केली. तसेच या कराराप्रमाणे कारखान्याने दिलेल्या उचल रकमेपैकी ठेकेदारांकडे बाकी असलेल्या रकमेची मागणी कारखाना अधिकारी व कामगारांनी त्यांच्याकडे केली असता त्यांच्याकडून शिवीगाळ व दमदाटी करण्याचे प्रकार घडत आहेत. या फसवणूक प्रकरणी काही दिवसांपूर्वी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बैठक घेऊन अशा ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व ऊसतोड कामगार-मुकादम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन केले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही या बैठकीत कारखान्याच्या फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळे आम्हास कायदेशीर कारवाई करता येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार उपळवे (ता. फलटण) येथील स्वराज साखर कारखान्याच्या झालेल्या फसवणूक प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सुमारे १५ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसात दाखल झालेले गुन्हे पुढीलप्रमाणे :
१) उपळवे (ता. फलटण) येथील ‘स्वराज ग्रीन पॉवर अॅण्ड फ्यूल लिमिटेड’ या कारखान्याची फसवणूक केल्या प्रकरणी स्वप्निल दादासो खुडे (रा. सांगवी, ता. फलटण) याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याची फिर्याद अनिलकुमार पांडुरंग तावरे (वय ४३, रा. उपळवे) यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांची माहिती अशी, दि. १६/०६/२०२२ व २९/०९/२०२२ दरम्यान उपळवे गावच्या हद्दीत स्वराज ग्रीन पॉवर अॅण्ड फ्यूल लिमिटेड या कारखान्याकडे स्वप्नील दादासो खुडे याने ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ( क्र. एम एच ११ डीए-४६११) व नवीन ट्रॅक्टरचा करार करून आगाऊ प्रत्येक ट्रॅक्टरला ६ लाख रुपये असे एकूण १२ लाख रुपये उचल घेवून त्यापैकी ११,५५,२३२/- रुपये येणे बाकी असताना आमच्या कारखान्यास ऊस वाहतूक न करता इतर कारखान्यास वाहतूक करून आमच्या कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे. त्याबाबत त्यास वेळोवेळी पैसे मागितले असता त्याने मला व कारखाना कामगारांना शिवीगाळ, दमदाटी केली आहे, अशी तक्रार दाखल झाली आहे.
या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत.
२) उपळवे (तालुका फलटण) येथे दि. ११/०६/२०२२ ते २९/०९/२०२२ या कालावधीत स्वराज साखर कारखान्याबरोबर नयना योगेश जाधव (रा. मार्डी, ता. माण, जि. सातारा) यांनी दि. ०६/०५/२०२२ रोजी ट्रॅक्टर एम एच ११जी ०२२३ चे ऊस वाहतुकीचा करार केला होता. करारापोटी कारखान्याने त्यांना ६ लाख रुपये दिले आहेत. मात्र, कराराप्रमाणे नयना योगेश जाधव (रा. मार्डी, ता.माण) यांनी आमच्या कारखान्याला ऊसतोडणी वाहतूक केली नाही. इतर कारखान्याला वाहतूक करत आमच्या कारखान्याची फसवणूक केली आहे. तसेच पैशांची मागणी केली असता कारखाना कामगारांना दमदाटी व मारहाणीची भाषा करत आहेत, अशी तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अनिलकुमार पांडुरंग तावरे यांनी दिली आहे.
या प्रकरणी नयना योगेश जाधव (रा. मार्डी, ता.माण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत.
३) उपळवे (तालुका फलटण) येथील स्वराज साखर कारखान्याबरोबर दि. ११/०७/२०२२ रोजी दत्ता पिराजी जगताप (रा. भवानवाडी, ता. जि. बीड) यांनी दि. ३०/०५/२०२२ रोजी प्रत्यक्ष हजर राहून ट्रक एम एच १४ बी जे २२७३ या वाहनाचा करार केलेला होता. सदर करारापोटी कारखान्याने त्यांना दि. ११.०७.२०२२ रोजी २,००,०००/- रुपये दिले होते. करारामध्ये ठरल्याप्रमाणे दत्ता जगताप यांनी ट्रक हजर केलेले नाहीत. याउलट सदर ट्रकची खोटी नोंदणी प्रमाणपत्र कारखान्यास दिलेले आहेत. ट्रकच्या कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी केली असता सदर ट्रकच्या आर. सी. कागदावर फेरफार करून खोटी कागदपत्र तयार करून कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे, अशी तक्रार ज्ञानेश्वर प्रकाश आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दत्ता पिराजी जगताप (रा. भवानवाडी, ता. जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.
४) उपळवे (ता. फलटण) येथील स्वराज साखर कारखान्याबरोबर दिनांक २०/०७/२०२२ ते २९/०९/२०२२ या कालावधीत ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार प्रकाश राजाराम पवार (रा. इस्लामपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याने दिनांक ११.०७.२०२२ रोजी प्रत्यक्ष हजर राहून उपळवे ता. फलटण येथे ट्रॅक्टर एम एच ४५ एफ ०२४८ या वाहनाचा करार केलेला होता. सदर करारापोटी आंम्ही त्यांना दिनांक २०.०७.२०२२ ते २९.०९.२०२२ रोजी कारखान्याच्या सेंट्रल बैंक ऑफ इंडीया च्या खातेवरुन रुपये १०,००,०००/- रुपये दिले होते. वर नमूद करारामध्ये ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर हजर केलेले नाहीत. याउलट सदर इसमाने ट्रॅक्टरचे खोटी नोंदणी प्रमाणपत्र दिलेले आहेत. कागदपत्राची ऑनलाईन तपासणी केली असता सदर ट्रॅक्टरच्या आर. सी. कागदावर फेरफार करून खोटी कागदपत्र तयार करून कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे. वरील आरोपीकडे कारखान्याच्या १० लाख रुपये उचलपैकी ७,११,४३२/- रुपये बाकी शिल्लक आहे. तुम्ही एकतर आमच्याकडे वाहतूक करा अथवा आमचे पैसे भरुन टाका असे म्हणाल्यावर त्यंने आमच्या कारखान्याचे अधिकारी सुनिल मोहीते व अनिलकुमार तावरे यांना दमदाटी व मारहाणीची भाषा करत आहेत, अशी तक्रार ज्ञानेश्वर प्रकाश आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश राजाराम पवार (रा. इस्लामपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.
५) उपळवे येथे दिनांक २२/०७/२०२२ ते २९/०९/२०२२ या कालावधीत महादेव देवीदास भोसेकर (रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) याने दिनांक १८/०५/२०२२ रोजी प्रत्यक्ष हजर राहून उपळवे ता.फलटण येथे ट्रॅक्टर नंबर एम एच ४२ एफ ३९२३ या वाहनाचा स्वराज साखर कारखान्याबरोबर करार केलेला होता. सदर करारापोटी कारखान्याने त्याला दिनांक २२/०७/२०२२ व दिनांक २९/०९/२०२२ रोजी कारखान्याच्या सेंट्रल बँक ऑफ इंडीया च्या खातेवरून रुपये ५,००,०००/- रुपये दिले होते. वर नमूद करारामध्ये ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर हजर केलेले नाहीत. याउलट सदर इसमाने ट्रॅक्टरचे खोटी नोंदणी प्रमाणपत्र दिलेले आहेत. कागदपत्राची ऑनलाईन तपासणी केली असता सदरट्रॅक्टरच्या आर. सी. कागदावर फेरफार करून खोटी कागदपत्र तयार करुन कारखाण्याची आर्थिक फसवणूक केली आहे. वरील आरोपीकडे आमच्या कारखान्याकडे वाहतूक करा अथवा आमचे पैसे भरुन टाका असे म्हटल्यावर त्याने आमच्या कारखान्याचे अधिकारी सुनिल मोहीते व अनिलकुमार तावरे यांना दमदाटी व मारहाणीची भाषा केली आहे. वरील इसमाने कारखान्याने दिलेल्या पैशाचा गैरवापर करून दमदाटी व मारहाणीची धमकी देवून आमची व आमच्या कारखाण्याची आर्थिक फसवणूक केली आहे, अशी तक्रार अनिलकुमार पांडुरंग तावरे यांनी फलटण ग्रामीण पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी महादेव देवीदास भोसेकर (रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.
६) उपळवे येथे दि. १२/०९/२०२२ ते २९/०९/२०२२ या कालावधीत नागेश संपत महाडिक (रा. शेवरे, ता. माढा, जि. सोलापूर) याने स्वराज साखर कारखान्याबरोबर दिनांक ०५/०९/२०२२ रोजी प्रत्यक्ष हजर राहून ट्रॅक्टर नंबर एम एच ४५ एस २४५३ व ट्रॅक्टर वाहन क्रमांक एम एच १२ सी पी ८८१८ या वाहनाचा करार केलेला होता. सदर करारापोटी कारखान्याने त्याला दिनांक १२/०९/२०२२ व दिनांक २९/०९/२०२२ रोजी कारखान्याच्या सेंट्रल बँक ऑफ इंडीया च्या खातेवरून रुपये ५,००,०००/- रुपये दिले होते. त्यापैकी ३,११,७००/- रक्कम येणे बाकी आहे. वर नमूद करारामध्ये ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर हजर केलेले नाहीत. याउलट सदर इसमाने ट्रॅक्टरचे खोटी नोंदणी प्रमाणपत्र दिलेले आहेत. आंम्ही वेळोवेळी फोनवरती व प्रत्यक्ष भेटून सांगितले की, तुमच्याकडे आमच्या कारखाण्याची ५.००,०००/- रुपये दिले होते त्यापैकी ३,११,७००/- रक्कम येणे बाकी असून तुम्ही एकतर आमच्याकडे वाहतूक करा अथवा आमचे पैसे भरुन टाका असे म्हणाल्यावर त्याने आमच्या कारखान्याचे अधिकारी अनिलकुमार तावर व सुनिल मोहिते यांना दमदाटी व मारहाणीची भाषा करीत आहेत, अशी तक्रार विनय राजेद्र पुजारी यांनी फलटण ग्रामीण पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी नागेश संपत महाडिक (रा. शेवरे, ता. माढा, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत.
७) उपळवे येथे दिनांक १०/०८/२०२२ ते १०/०८/२०२२ या कालावधीत बापू दादा सरगर (रा. कण्हेर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याने स्वराज साखर कारखान्याबरोबर दिनांक ०२/०८/२०२२ रोजी प्रत्यक्ष हजर राहून ट्रॅक्टर नंबर एम एच ४५ ए.डी १४८३ व ट्रॅक्टर नंबर एम एच ४४ डी २९७७ या वाहनांचा करार केलेला होता. सदर करारापोटी आम्ही त्यांना दिनांक १०/०८/२०२२ दिनांक २९/०९/२०२२ रोजी कारखान्याच्या सेंट्रल बैंक ऑफ इंडीयाच्या खातेवरून रुपये ५,००,०००/- रुपये दिले होते. त्यापैकी ४,६५,२४९/- रक्कम येणे बाकी आहे. वर नमूद करारामध्ये ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर हजर केलेले नाहीत. याउलट सदर इसमाने ट्रॅक्टरचे खोटी नोंदणी प्रमाणपत्र दिलेले आहेत. कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी केली असता सदर ट्रॅक्टरच्या आर. सी. कागदावर फेरफार करून खोटी कागदपत्र तयार करून कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे. आमचे पैसे भरून टाका, असे म्हणाल्यावर त्याने आमच्या कारखाण्याचे अधिकारी स्वप्नील रणवरे व ज्ञानेश्वर आगवणे यांना दमदाटी व मारहाणीची भाषा करीत होते व सध्या ही करीत आहेत, अशी तक्रार नितीन राघु कर्णे यांनी फलटण ग्रामीण पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी बापू दादा सरगर (रा. कण्हेर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.
८) उपळवे (तालुका फलटण) येथे दिनांक १६/०६/२०२२ ते ०७/१०/२०२२ या कालावधीत स्वराज साखर कारखान्याबरोबर सोमनाथ मारुती निकम (रा. गारआकोले, ता. माढा, जि. सोलापूर) याने दिनांक ३१/०५/२०२२ रोजी प्रत्यक्ष हजर राहून ट्रॅक्टर नंबर एम एच ३९ एन ३६५७ या वाहनाचा करार केलेला होता. सदर करारापोटी आम्ही त्यांना दिनांक १६/०६/२०२२ व दिनांक ०७/१०/२०२२ रोजी कारखान्याच्या सेंट्रल बैंक ऑफ इंडीया च्या खातेवरुन रुपये ४,००,०००/- रुपये दिले होते. त्यापैकी ३,१२,३००/- रक्कम येणे बाकी आहे. वर नमूद करारामध्ये ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर हजर केलेले नाहीत. याउलट सदर इसमाने ट्रॅक्टरचे खोटी नोंदणी प्रमाणपत्र दिलेले आहेत. कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी केली असता सदर ट्रॅक्टरच्या आर. सी. कागदावर फेरफार करून खोटी कागदपत्रः तयार करून कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे. आम्ही वेळोवेळी फोनवरती व प्रत्यक्ष भेटून सांगितले की, तुमच्याकडे आमच्या कारखाण्याची ४,००,०००/- रुपये दिले होते त्यापैकी ३,१२,३००/- रक्कम येणे बाकी असून तुम्ही एकतर आमच्याकडे वाहतूक करा अथवा आमचे पैसे भरून टाका असे म्हणाल्यावर त्याने आमच्या कारखान्याचे अधिकारी अनिलकुमार तावरे क सुनिल मोहिते यांना दमदाटी व मारहाणीची भाषा करीत आहेत, अशी तक्रार प्रदीप बाबासो मोहिते यांनी फलटण ग्रामीण पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सोमनाथ मारुती निकम (रा. गारआकोले, ता. माढा, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत.
९) स्वराज साखर कारखान्याबरोबर उपळवे येथे दिनांक ११/०७/२०२२ ते २९/०९/२०२२ रोजी १०.०० वाजता गणेश बबन महागडे (रा. परखंदी, ता. वाई, जि. सातारा) याने दिनांक २८/०६/२०२२ रोजी प्रत्यक्ष हजर राहून ट्रॅक्टर नंबर एम एच ११ सी क्यू २१५९ या वाहनाचा करार केलेला होता. सदर करारापोटी आम्ही त्यांना दिनांक ११/०७/२०२२ व दिनांक २९/०७/२०२२ रोजी कारखान्याच्या सेंट्रल बँक ऑफ इंडीया च्या खातेवरून रुपये ६,००,०००/- रुपये दिले होते. वर नमूद करारामध्ये ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर हजर केलेले नाहीत. याउलट सदर इसमाने ट्रॅक्टरचे खोटी नोंदणी प्रमाणपत्र दिलेले आहेत. तसेच आमच्या कारखाण्याचे अधिकारी अनिलकुमार तावर व सुनिल मोहिते यांना दमदाटी व मारहाणीची भाषा करीत आहेत, अशी तक्रार फलटण ग्रामीण पोलिसात प्रदीप बाबासो मोहिते यांनी दिली आहे.
या प्रकरणी गणेश बबन महांगडे (रा. परखंदी, ता. वाई, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत.
१०) उपळवे (ता. फलटण) येथील स्वराज साखर कारखान्याबरोबर दिनांक १२/०५/२०२२ ते ११/०७/२०२२ या कालावधीत महेश रामचंद्र शिंदे (रा. परखंदी, ता. वाई, जि. सातारा) याने करार केला होता. या करारापोटी कारखान्याने महेश शिंदे याला पैसे दिले होते. मात्र, शिंदे याने ट्रॅक्टरचे दस्तऐवज खोटे देऊन कारखान्याचे दिलेल्या पैशाचा गैरवापर केला. तसेच कारखान्याच्या अधिकारी व कामगारांना दमदाटी व मारण्याची धमकी देऊन कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे, अशी तक्रार फलटण ग्रामीण पोलिसात विनय राजेंद्र पुजारी यांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी महेश रामचंद्र शिंदे (रा. परखंदी, ता. वाई, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत.
११) उपळवे येथील स्वराज साखर कारखान्याबरोबर दि. १७/०५/२०२२ ते २१/०५/२०२२ या कालावधीत शरद बाळासाहेब रूपनवर (रा. एकशिव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व बाळासाहेब जगू रूपनवर (रा. एकशिव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी प्रत्यक्ष हजर राहून ट्रॅक्टर नंबर एम एच ४५ ए एफ ९२९८ व एम एच १६ ए इ ९२९४ या वाहनांचा करार केलेला होता. सदर करारापोटी आम्ही त्यांना दिनांक १६/०६/२०२२ व दिनांक २९/०९/२०२२ रोजी कारखान्याच्या सेंट्रल बैंक ऑफ इंडीया च्या खातेवरुन रुपये १४,००,०००/- रुपये दिले होते. त्यापैकी ७,००,०००/- रक्कम येणे बाकी आहे. वर नमूद करारामध्ये ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर हजर केलेले नाहीत. याउलट सदर इसमाने ट्रॅक्टरचे खोटी नोंदणी प्रमाणपत्र दिलेले आहेत. कागदपत्राची ऑनलाईन तपासणी केली असता सदर ट्रॅक्टरच्या आर. सी. कागदावर फेरफार करून खोटी कागदपत्रः तयार करून कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे. आम्ही वेळोवेळी फोनवरती व प्रत्यक्ष भेटून सांगितले की, तुमच्याकडे आमच्या शरद बाळासाहेब रुपनवर कारखाण्याची ७,००,०००/- रुपये दिले होते. त्यापैकी ७,०१,०००/- रक्कम येणे व बाळासाहेब जगू रुपणवर २,३२१९३/-रुपये दिले होते त्यापैकी ३,६४,४६५/- रक्कम येणे बाकी असून तुम्ही एकतर आमच्याकडे वाहतूक करा अथवा आमचे पैसे भरून टाका, असे म्हटल्यावर त्याने आमच्या कारखान्याचे अधिकारी अनिलकुमार तावरे व सुनिल मोहिते यांना दमदाटी व मारहाणीची भाषा करीत आहेत, अशी तक्रार विनय राजेंद्र पुजारी यांनी फलटण ग्रामीण पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी शरद बाळासाहेब रूपनवर (रा. एकशिव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व बाळासाहेब जगू रूपनवर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. बी. शिंदे करत आहेत.
१२) उपळवे येथे दिनांक २१/०५/२०२२ ते ११/०७/२०२२ या कालावधीत चांगदेव रामचंद्र देवकर (रा. तांबेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याने स्वराज साखर कारखान्याबरोबर ऊस तोडणी वाहतुकीचा करार केला होता. या करारापोटी कारखान्याने देवकर याला पैसे दिले होते. मात्र, देवकर याने ट्रॅक्टरचे दस्तऐवज खोटे देऊन कारखान्याचे दिलेल्या पैशाचा गैरवापर केला. तसेच कारखान्याच्या अधिकारी व कामगारांना दमदाटी व मारण्याची धमकी देऊन कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे, अशी तक्रार फलटण ग्रामीण पोलिसात नितीन राघु कर्णे यांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चांगदेव रामचंद्र देवकर (रा. तांबेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत.
१३) उपळवे (ता. फलटण) येथील स्वराज साखर कारखान्याबरोबर दिनांक १९/०९/२०२२ ते १३/१०/२०२२ या कालावधीत सुभाष पोपट चव्हाण (रा. शिंधी, ता. चाळीसगाव, जि.जळगाव) याने ऊस तोडणी वाहतुकीचा करार केला होता. या करारापोटी कारखान्याने चव्हाण याला पैसे दिले होते. मात्र, चव्हाण याने ट्रॅक्टरचे दस्तऐवज खोटे देऊन कारखान्याचे दिलेल्या पैशाचा गैरवापर केला. तसेच कारखान्याच्या अधिकारी व कामगारांना दमदाटी व मारण्याची धमकी देऊन कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे, अशी तक्रार फलटण ग्रामीण पोलिसात ज्ञानेश्वर प्रकाश आगवणे यांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सुभाष पोपट चव्हाण (रा. शिंधी, ता. चाळीसगाव, जि.जळगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक एन. बी. शिंदे करत आहेत.
१४) उपळवे येथे दिनांक १६/०६/२०२२ ते २९/०९/२०२२ या कालावधीत संदीप दत्तात्रय कदम, शुभांगी संदीप कदम (दोघे रा. हिंगे वाठार, ता. भोर, जि. पुणे) यांनी स्वराज साखर कारखान्याबरोबर ऊस तोडणी वाहतुकीचा करार केला होता. या करारापोटी कारखान्याने कदम यांना पैसे दिले होते. मात्र, कदम यांनी ट्रॅक्टरचे दस्तऐवज खोटे देऊन कारखान्याचे दिलेल्या पैशाचा गैरवापर केला. तसेच कारखान्याच्या अधिकारी व कामगारांना दमदाटी व मारण्याची धमकी देऊन कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे, अशी तक्रार फलटण ग्रामीण पोलिसात प्रदीप बाबासो मोहितेे यांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संदीप दत्तात्रय कदम, शुभांगी संदीप कदम (दोघे रा. हिंगे वाठार, ता. भोर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक एन. बी. शिंदे करत आहेत.
१५) उपळवे (ता. फलटण) येथे दिनांक १६/०६/२०२२ ते २९/०९/२०२२ या कालावधीत संदीप पोपटराव पाटील (रा. लासुरणे, ता. इंदापूर, जि. पुणे) याने स्वराज साखर कारखान्याबरोबर ट्रॅक्टर नंबर एम एच ४२ बीसी २६७५ व ट्रॅक्टर नंबर एम एच ४५ एस ३९२५ या वाहनांचा करार केलेला होता. सदर करारापोटी आम्ही त्यांना दिनांक १६/०६/२०२२ व दिनांक २९/०९/२०२२ रोजी कारखान्याच्या सेंट्रल बँक ऑफ इंडीया च्या खातेवरून रुपये ५,००,०००/- रुपये दिले होते. वर नमूद करारामध्ये ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर हजर केलेले नाहीत. याउलट सदर इसमाने ट्रॅक्टरचे खोटी नोंदणी प्रमाणपत्र दिलेले आहेत. आंम्ही वेळोवेळी फोनवरती व प्रत्यक्ष भेटून सांगितले की, तुमच्याकडे आमच्या कारखान्याची ५,००,०००/- रुपये दिले होते. तुम्ही एकतर आमच्याकडे वाहतूक करा अथवा आमचे पैसे भरुन टाका असे म्हणाल्यावर त्याने आमच्या कारखाण्याचे अधिकारी अनिलकुमार तावरे व सुनिल मोहिते यांना दमदाटी व मारहाणीची भाषा करीत आहेत, अशी तक्रार नितीन राघू कर्णे यांनी फलटण ग्रामीण पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी संदीप पोपटराव पाटील (रा. लासुरणे, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. बी. शिंदे करत आहेत.