वीर धरणातून निरा नदीपात्रात 14 हजार क्युसेक्स विसर्ग; बुधवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून चौदा हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग


 

स्थैर्य, लोणंद, दि. १४: सातारा व पुणे जिल्हयाच्या सीमेवर असणाऱ्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे तसेच सध्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे संध्याकाळी चार वाजल्यापासून निरा नदीपात्रात चौदा हजार क्युसेक्स ने विसर्ग करण्यात येत आहे. 

निरा नदीवरील वीर धरण ऑगस्ट महिन्यातच पुर्ण क्षमतेने भरले असून तेंव्हा पासून सातत्याने नदी पात्रातून, कालव्यातून व विद्युत गृहातूनही धरणातील पाणी नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती वीर धरण उपविभागाचे सहायक अभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.

वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधे नीरा खोऱ्यात असलेली भाटघर ,नीरा देवधर, गुंजवणी ही सर्व धरणे यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे जवळपास पुर्ण क्षमतेने भरली आहेत तर वीर धरण दोन महिन्यांपूर्वीच तेरा ऑगस्ट रोजी पुर्ण क्षमतेने भरले आहे . वीर धरणातून बुधवारी संध्याकाळी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे धरणक्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे चौदा हजार क्युसेक्स ने विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. वीर धरण प्रशासनाच्या वतीने नीरा नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . तसेच कोणीही नदीपात्रात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!