स्थैर्य, सातारा, दि. १३ : वेरुळी ता. वाई जि. सातारा गावचे हद्दीत कुकुरांजाणा नावचे शिवारात राजेश जनार्धन श्रीगिरी यांचे मालकीचे बंगल्यामध्ये अवैध तीन पानी जुगार अड्ड्यावर एलसीबीने छापा टाकून 86 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी 14 जणांनाअटक झाली असून त्यात सातारा शहरातील अनेक उच्चभ्रू लोक आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी वेरुळी ता.वाई जि.सातारा गावचे हद्दीत वेरुळी गावी कुकुरांजाणा नावचे शिवारात राजेश जनार्धन श्रीगिरी यांचे मालकीचे बंगल्यामध्ये जिल्ह्यात कोविड -१ ९ प्रादुर्भाव असताना, जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करुन अवैध तीन पानी पत्ते पैशावर पैज लावुन जुगार खेळत होते. सदर ठिकाणी छापा टाकुन एकुण १४ इसमांना ताब्यात घेतले. त्यांचे कब्जातुन ८६,२५,२८०रु. चा मुद्देमाल जप्त केला. सदरचे चौदा इसम हे उच्चभ्रु असुन ते सर्वजन पुणे व सातारा येथुन त्यांच्या चार चाकी पाच अलिशान गाड्यामधुन केवळ जुगार खेळण्यासाठी आले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेकडुन गाड्या जप्त करणेत आल्या आहेत . त्यांना पुढील कारवाईसाठी वाई पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले आहे . सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, व धिरज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी दिलेल्या सूचना नुसार व सर्जेराव पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली आनंदसिंग साबळे, पो. हवा. आनंदराव भोईटे, सुधीर बनकर, मुबीन मुलाणी, पोलीस नाईक शरद बेबले, नितीन गोगावले प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, गणेश कापरे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम पिसाळ, विशाल पवार, वैभव सावंत व चालक संजय जाधव व पंकज बेसके, महिला पोलीस मोना निकम, विद्याताई पवार, नुतन बोडरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.