दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२४ | सातारा |
कोयना धरणात गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १४.९३ टीएमसी (१४.१९%) पाणीसाठा नोंदला गेला. धरण क्षेत्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसास सुरुवात झाली असून पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठ्यापैकी ०९.८१ टीएमसी (०९.७९%) पाणी उपयुक्त आहे.
गुरुवारी कोयना येथे ३९ मि.मी. (आजपर्यंत एकूण ३३९), नवजा येथे ६७ मि.मी. (एकूण ४७१) तर महाबळेश्वर येथे ४० मि.मी. (एकूण ३२७) पाऊस पडला.