सातारा तहसीलदार यांच्या सरकारी बँक खात्याचे (एसबीआय) चेकबूक चोरून 13 लाख 65 हजारांची रक्कम लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.४: सातारा तहसीलदार यांच्या सरकारी बँक खात्याचे (एसबीआय) चेकबूक चोरून त्यातील धनादेशांवर तहसीलदारांची बनावट सही व पदनाम शिक्का मारून 13 लाख 65 हजारांची रक्कम काढण्याचा प्रकार घडला आहे. या अपहारप्रकरणी सहायक लेखा अधिकार्‍यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रमेश जोमू वसावे (सहायक लेखा अधिकारी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. सध्या कार्यरत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, सातारा) असे त्याचे नाव आहे. 12 जून ते 29 सप्टेंबर दरम्यान त्याने अपहार केल्याचे तहसील कार्यालयातील लिपिकाच्या निदर्शनास आले.

याबाबत तहसील कार्यालयातील लिपिक विलास मधु पडोळकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, सातारा येथील तहसील कार्यालयात रमेश जोमु वसावे हे सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून मार्च 2020 अखेरपर्यंत काम करत होते. तद्नतर त्यांना कार्यमुक्त केले असून सध्या ते जिल्हा पूरवठा अधिकारी कायालय सातारा येथे कार्यरत आहेत. तहसीलदार सातारा यांचे सरकारी बँक खाते एसबीआय शाखा प्रतापगंजपेठ सातारा येथे आहे. त्या खात्यावर पुरवठा विभाग, संजय गांधी योजना, नैसर्गिक आपत्ती, निवडणूक विभाग व अन्य विभागवार संवधनर्नाचे अंतर्गत लागणारा निधी अनुदान सरकारकडून जमा होत असतो. दि. 29 सप्टेंबरला सांयकाळी लिपिक पडोळकर आणि व ऐश्‍वर्या सुर्वे लिपीक (आस्थापना) यांनी महिनाअखेर असल्याने आहरण व वितरण अधिकारी यांच्या एसबीआय बँक खात्यातील विवरण पत्राची प्रिंट काढून पाहिली. त्यामध्ये दि. 1 सप्टेंबरला याच कार्यालयातील निवडणुक शाखेत पूर्वी कार्यरत असलेल्या रमेश वसावे याच्या खात्यावर धनादेश क्रमाक 369819 नुसार 3 लाख 95 हजार जमा झाल्याचे निर्दशनास आले. म्हणून पडोळकर यांनी संपूर्ण महिन्याचे विवरण पत्र तपासले असता त्याच महिन्यात दि. 29 सप्टेंबरला रोजी धनादेश क्रमांक 369820 अन्वये रक्कम रुपये 3 लाख 85 हजार रमेश जोमू वसावे याच्या खात्यावर जमा झालेचे दिसून आले. म्हणून पडोळकर यांनी संपूर्ण महिन्याचे विवरण तपासले. यावेळी त्याच महिन्यात दि. 29 सप्टेंबरमध्ये रमेश वसावेच्या खात्यावर 3 लाख 85 हजार जमा झाल्याचे दिसून आले. ही बाब त्यांनी प्रभारी निवडणुक नायब तहसीलदार दयानंद कोळेकर, व प्रभारी तहसीलदार सुनिल मुनाळे यांच्या निदर्शनास आणून दिली व मूळ निवडणुक नायब तहसीलदार यांना दूरध्वनीवरून कळवले. यानंतर दोन्ही धनादेशांची चौकशी सुरू झाली. धनादेशांच्या नोंदी तपासल्या असता 3698 या क्रमांकाने सुरु होणारे चेकबूक कार्यालयात आढळून आली नाही. त्यानंतर मात्र तहसील कार्यालयाने तातडीने दोन्ही धनादेशांच्या स्कॅन कॉपी मिळण्यासाठी एसबीआय बँकेला पत्र देण्यात आले. चोरीस गेलेल्या चेकबुकमधील कोणतेही धनादेश वठवण्यात येऊ नयेत बँकेला कळवण्यात आले. तसेच दि. 30 सप्टेंबर रोजीच्या धनादेश क्र. 369819 व 369920 या दोन धनादेशान्वये वसावेच्या बँक खात्यावर जमा झालेली रक्कम रोखून धरण्याबाबत पत्र देण्यात आले. त्यानंतर पुन्हा पडोळकर यांनी आहरण व संवितरण अधिकारी यांच्या बँक खात्यामध्ये विवरणपर ऑनलाईन चेक केले असता दि. 30 सप्टेंबर रोजी रमेश वसावे याने 20 हजार, 20 हजार व 3 लाख 45 हजार अशी रक्कम पुन्हा भरल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर दिनांक 30 सप्टेंबर रोजी 3898 या क्रमांकाने सुरु होणार्‍या धनादेशाची नोंदी तपासल्या असता धनादेश क्रमांक 369801 व 369802 दिनांक 3/3/2020 धनादेश 369803 व 369804, दिनांक 5/3/2020 धनादेश क्र. 389805 दि. 6/3/2020 रोजी निवडणुक शाखेतील पुरवठादार सत्यम स्वयरोजगार सहकारी संस्था मर्या. मलकापुर यांनी दिलेले आहेत, असे रोकड नोंदवरुन दिसून येते. 

वसावे हे लेखा शाखेतील अनुभवी कर्मचारी म्हणुन त्यांना रोकडवडी, धनादेश नोंदवहीतील नोंदी अद्यावत करण्याचे कामकाज वरिष्ठांनी तोंडी सांगण्यात आले होते. रोकडवडी, धनादेश पुस्तिका व धनादेश नोंदवही वसावे यांच्या ताब्यात वरीष्ठांचे सांगणेवरुन दिलेले होते व त्याबाबत सर्व कामकाज ते पाहत होते. 

सप्टेंबर 2020मध्ये 369819 व 389820 हे दोन धनादेश बँक स्टेटमेन्टमध्ये कॅश झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, कार्यालयीन अभिलेखावर 369805 या क्रमाकापर्यंतच धनादेश देण्यात आल्याचे नमुद आहे. म्हणुन 369806 ते 369818 पर्यंतचे व त्याच पुस्तकातील क्रमांकाचे धनादेश यापुर्वी वापर करुन शासकीय रक्कमेची आणखी अपहार केलेला आहे किंवा कसे याबाबत ऑनालाईन बँक विवरणपत्राची तपासणी केली असता दिनांक 12 जून 2020 रोजी धनादेश क्रमांक 369807 अन्वये रक्कम रुपये 5 लाख 85 हजार सुशांत बाबासाहेब पवार यांच्या नावे जमा झाल्याचे दिसून येते.

सुशांत बाबासाहेब पवार हे तहसील कार्यालयाकडील पुरवठादार अथवा कर्मचारी नसून हा धनादेश या कार्यालयाकडून देण्यात आलेला नाही. याबाबत ऑनलाईन बँक विवरणपत्रावरुन तपासणी केली असता आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खात्यामधुन वरील प्रमाणे एकुण 13 लाख 65 हजार इतक्या शासकीय रक्कमेचा अपहार करुन त्यातील 3 लाख 85 हजार पुन्हा भरल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले आहे. या क्रमांकाचे चेक पुस्तक कार्यालयात शोधले असता ते अद्यापपर्यंत मिळून आले नाही. म्हणजेच वसावे याने संबंधित क्रमांकाचे धनादेश पुस्तक वरीष्ठांनी विश्‍वासाने ताब्यात दिले असता चोरुन नेवून त्यावर तहसीलदार सातारा यांची बनावट सही करुन व तहसीलदार यांच्या पदनामाचा शिक्का उमटवून शासनाची फसवणुक करून शासकीय रक्कमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून वसावे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!