प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये 11वी कॉमर्स प्रवेश प्रक्रिया सुरु

मोफत ऑनलाईन प्रवेश नावनोंदणी सुविधा आजपासून उपलब्ध


दैनिक स्थैर्य । 22 मे 2025। फलटण । कोळकी येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी कॉमर्स (इंग्रजी माध्यम) शाखेसाठी शैक्षणिक वर्ष 2025- 26 प्रथमच शासन निर्णयानुसार ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने गुणवत्तेनुसार प्रवेश होणार दिले जाणार आहेत. यासाठी मोफत ऑनलाइन नोवनोंदणी सुविधा उपलब्ध आहे. केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नावनोंदणी सोमवार (दि.19) मे पासुन सुरु झाली आहे. तरी इंग्रजी माध्यमाच्या कॉमर्स शाखेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन ऑनलाइन प्रवेशप्रक्रिये संबंधी अधिक माहिती घ्यावी.

विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून कॉमर्स शाखेचे गुणवत्तापुर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह मध्ये वाणिज्य शाखा शैक्षणिक वर्षे 2020 – 21 पासून सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत इ.12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल सलग चार वर्षे 100 टक्के असुन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश संपादन केलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रमासह इतर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात त्यामध्ये प्रामुख्याने विषयनिहाय तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन सत्रे, व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळा, औद्योगिक क्षेत्रभेटींचे आयोजन,सी. ए. फाऊंडेशन मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य व व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठीही विशेष उपक्रम राबविले जातात.महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजीटल क्लासरुम्स व इतर सुविधा, प्रोग्रेसिव्ह आयआयटी मार्फत एमकेसीएलचे विविध कोर्सेस, मुलींसाठी मोफत पास सुविधा इ. सुविधा उपलब्ध आहेत.

तसेच महाविद्यालयात इंग्रजी,आरोग्य व शा.शिक्षण,पर्यावरण शिक्षण हे अनिवार्य विषय आणि आय टी अथवा मराठी, बुक किपिंग अ‍ॅन्ड अकौंटन्सी, सेक्रेटरी प्रॅक्टिस, ओसीएम2 आणि इकोनोमिक्स हे ऐच्छिक विषय शिकविले जातात. यासाठी तज्ञ, अनुभवी आणि तंत्रस्नेही प्राध्यापक वर्ग आहे.तसेच विविध क्रीडा स्पर्धांसाठी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उज्वल भविष्याचा पाया अधिक सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी नावनोंदणी करून प्रोग्रेसिव्ह ची प्रवेशासाठी निवड करावी असे आवाहन संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड यांनी केले आहे. तसेच प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा.सौ. प्रज्ञा देशमुख (9822685012), प्रा. पुजा साठे (93253 57403) पर्यवेक्षक महेंद्र कातुरे (8805181127) व प्राचार्य अमित सस्ते (9765458651) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!