राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, पुणे, दि.१०: करोना महामारीकडे आव्हान म्हणून न पाहता देशासाठी सेवा करण्याची संधी आहे असे मानून युवकांनी साहसी होऊन समर्पण भावनेने देशासाठी कार्य करावे अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्नातकांना केली.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच लोकमान्य टिळक यांचे आदर्श डोळ्यांपुढे ठेवून कार्य केल्यास तुम्ही देखील आदर्श नागरिक व्हाल असे राज्यपालांनी यावेळी युवकांना सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह आज राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. उद्योगपती डॉ. नौशाद फोर्ब्स प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुशाखा तसेच आंतरशाखा अध्ययनाला चालना दिली असल्याचे सांगून विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना बहुशाखा अभ्यास करण्यासाठी प्रेरित करावे अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली. चीनची अर्थव्यवस्था आणि संरक्षण सिद्धता भारतापेक्षा मोठी असली तरीही विविधतेतून एकता हे आपले बलस्थान असल्याचे त्यांनी सांगितले.

दीक्षांत समारोहात ७०३५ पदवी व पदव्युत्तर स्नातक, १३ एमफील तसेच १०४ पीएचडी धारकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.

विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमळकर, विद्यापीठांच्या प्राधिकारणांचे सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!