दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । मुंबई । नांदेड जिल्ह्यातील सुमारे 113 किमी इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांना दर्जोन्नत करून ते प्रमुख जिल्हा मार्ग करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी 3 हजार432.55 किलोमीटर इतकी झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, लोहा, नायगाव व मुदखेड तालुक्यातील तर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा प्रस्ताव औरंगाबाद प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता व नांदेड जिल्हा परिषदेने दिला होता. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता. या प्रस्तावानुसार, खालील मार्ग दर्जोन्नत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
प्रजिमा 28 ते जुने कल्लाळ-काळेश्वर-विष्णूपूर प्ररामा 6- पांगरी – असदवन – गोपाळचावडी तुप्पा रस्ता (दर्जोन्नत लांबी 16.500 किमी), बाभुळगाव-तुप्पा-भायेगाव-पिंपळगाव-मिश्री- पुणेगाव रस्ता (दर्जोन्नत लांबी 16 किमी), चैतन्य नगर-तरोडा (बु.)-पिंपळगाव-महादेव दाभड राममा 361- खडकुत नांदला-दिग्रस ते आसना नदी पर्यंत (16.50 किमी), पांगरी झरी –वडेपुरी राममा 161- जाणापुरी-बामणी –सोनखेड रस्ता (16.50 किमी.), सोनखेड-कोलेबोरगाव-जवळा-बेटसांगवी प्रतिमा 28-गंगाबेट रस्ता (12 किमी), प्रजिमा 28- कारखाना सायाळ-पार्डी- पिंपळगाव-पोखरभोसी प्रतिमा-52 रस्ता (18.50 किमी), राममा 247- असरजन-विष्णुपुरी-असदवन रस्ता (11.850 किमी), खडकुत महादेव-पिंपळगाव दाभड राममा 361-यमशेटवाडी-देगाव जावळा-मुरहारनिवघा ते रामा 261 ला जोडणारा रस्ता (6 किमी) या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यात आला आहे.